नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (8 नोव्हेंबर ) झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून दिल्लीने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला.दिल्लीकडून अनुभवी फलंदाज शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस सलामीला आले होते. सामना संपल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने स्टॉयनिसला सलामीला पाठवण्याचे कारण सांगितले.
…तर स्टॉयनिस चांगली सुरुवात देऊ शकतो
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “आम्हाला जलद गतीने डावाची सुरुवात करायची होती. आम्हाला वाटले की जर मार्कस स्टॉयनिस स्फोटक फलंदाजी करत असेल, तर तो आपल्याला चांगली सुरुवात देऊ शकतो.”
प्रशिक्षक आणि सहाय्य्क कर्मचाऱ्यांचे पाठबळ
“आता चांगल वाटत आहे. हा एक रोलरकास्टरसारखा प्रवास आहे. दिवसअखेर आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र राहिलो. प्रत्येक व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांमुळे मी आनंदी आहे. मला बर्याच गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत. कर्णधार म्हणून बऱ्याच जबाबदाऱ्या असतात.परंतु प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांचे मला पाठबळ आहे. हा संघ खूप खास आहे. यासारख्या संघाचा भाग झाल्यामुळे मी खरंच भाग्यवान आहे.” असेही पुढे बोलताना अय्यर म्हणाला.
राशिद खानविरुद्ध बनवली होती योजना
संघाच्या योजनेबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “भावना सतत कमी जास्ती होत असतात, त्यामुळे आपल्याकडे एकसारखा नित्यक्रम राहू शकत नाही. आपल्यात बदल करत राहायला हवं. आशा आहे की पुढच्या सामन्यातही आम्ही मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मुक्तपणे खेळू शकू. आम्ही मोठी धावसंख्येकडे कूच करत होतो. आम्हाला माहित होते की राशिद खान मधल्या षटकांत घातक ठरू शकतो. त्याला विकेट न देण्याची आमची योजना होती.”
दिल्लीने दिले 190 धावांचे लक्ष्य
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन (78) आणि मार्कस स्टॉयनिस (38) यांनी डावाची चांगली सुरुवात केली. आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमीयरनेही 22 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी साकारली. या फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले.
हैदराबादचा झाला पराभव
प्रत्युत्तरादाखल हैदराबादने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या आणि सामना गमावला. केन विल्यमसनने 45 चेंडूत 67 धावा फटकावल्या.
दिल्लीच्या गोलंदाजांनी केली उत्कृष्ट कामगिरी
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 29 धावांत 4 बळी घेतले तर माध्यमगती गोलंदाज मार्कस स्टॉयनिसने 26 धावा देऊन 3 बळी घेतले. फिरकीपटू अक्षर पटेलला 1 बळी घेण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीने केली १३ वर्षांची प्रतिक्षा; पाहा अन्य संघांचा काय आहे रेकॉर्ड
IPL 2020 : या ५ कारणांमुळे मुंबई इंडियन्स जिंकू शकतात पाचवे विजेतेपद
हैदराबादला १७ धावांनी धूळ चारत दिल्लीची फायनलमध्ये धडक, पाहा यापुर्वीच्या फायनलचा इतिहास
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत