आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलेरने त्यांचा एक आघाडीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला सोडुन सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले. दरम्यान, आरसीबीने या वर्षीच्या आयपीएल लिलावापूर्वी आपल्या अनेक गोलंदाजांना सोडले आहे, त्यापैकी एक आहे जोश हेझलवूड, ज्याने आगसीबीसाठी चांगली कामगिरी केली होती.
या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातही चमकदार कामगिरी केली होती. भारतीय खेळपट्ट्यांवर ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवण्यात जोश हेझलवूड (Josh Hazlewood) याचा मोठा वाटा होता. याशिवाय, तो गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करत आहे, परंतु असे असतानाही जोश हेझलवूडला आरसीबीने सोडले. आता आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांनी याचे मुख्य कारण सांगितले आहे.
आरसीबीच्या प्रशिक्षकाने सांगितले की, “मी जोश याच्याशी फोनवर बोललो होतो. मार्चच्या अखेरीस तो वडिडील होणार आहे आणि त्यासाठी तो खूप उत्सुक होता. यामुळे जोश त्यावेळी आमच्यासोबत उपस्थित राहू शकणार नाही. तो हंगामाच्या किमान पहिल्या अर्ध्या सामन्यांसाठी अनुपलब्ध असेल. अशा परिस्थितीत त्याला सोडण्याचा निर्णय घेणे फार कठीण होते. आम्ही त्याचा आदर करतो. त्याने संघासाठी जे काही केले त्याचा आम्ही खूप आदर करतो. हा निर्णय खूप महत्त्वाचा होता आणि म्हणूनच हा निर्णय अतिशय गांभीर्याने घेतला. आम्ही त्यावर खूप चर्चा केली आणि मग त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.”
आरसीबीपूर्वी जोश हेझलवूड चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता आणि आरसीबीने 7.75 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. अशा परिस्थितीत, या वर्षीच्या अर्ध्या हंगामात जोश हेझलवूडचा संघात कोणीही समावेश केला नाही, तर 2025 मध्ये होणाऱ्या मेगा लिलावात आरसीबी पुन्हा एकदा त्याचा संघात समावेश करू शकते. (Why did RCB drop Josh Hazlewood revealed by the head coach himself Said This decision is very)
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…
‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन