भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या जोडीने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने वेगळीच छाप सोडली होती. दोघांनीही एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली आपल्या फिरकी गोलंदाजीने भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिले होते. या जोडीला ‘कुलचा’ असे नाव देण्यात आले होते.
परंतु धोनीने निवृत्ती घेतल्यापासून या दोघांचीही कामगिरी ढासळली आहे. दोघांना संघात स्थान मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. तर का तुटली ‘कुलचा’ची जोडी? काय आहे यामागचे कारण? याचे उत्तर स्वतः युजवेंद्र चहलने दिले आहे.
युजवेंद्र चहलने स्पोर्ट्स तकसोबत बोलताना म्हटले की, “मी आणि कुलदीप यादव २०१८ पर्यंत संघात एकत्र खेळलो. त्यामागील प्रमुख कारण हार्दिक पंड्या होता. हार्दिक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू होता आणि तो गोलंदाजीही करत असे. त्यामुळे संघात दोन फिरकी गोलंदाजा वापरत केला जात असे. परंतु हार्दिकच्या दुखापतीनंतर रवींद्र जडेजा संघात आला. येथून सर्व काही बदलले.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघात अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती. कारण संघातील समतोल राखण्यासाठी हे आवश्यक होते की, ७ व्या क्रमांकांवर कोणीतरी फलंदाजी करावी. परंतु जडेजा फिरकी गोलंदाज असल्यामुळे साहजिक होते की, मी किंवा कुलदीपमधून एकाला तरी बाहेर बसावे लागेल आणि झालेही तसेच.”
जडेजाने गेल्या काही वर्षात, भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात त्याने आपली वेगळीच छाप सोडली आहे.
युजवेंद्र चहलला जडेजाच्या प्रवेशानंतर भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळत आहे. परंतु कुलदीप यादवला अजूनही संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कुलदीप यादवने अनेकदा म्हटले आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर केल्यापासून त्याच्या कामगिरीवर खूप फरक पडला आहे.
चहलने आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु कुलदीप यादवला आयपीएल स्पर्धेत देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. क्रिकेट चाहते ‘कुलचा’ला एकत्र खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माही’च्या मृत गर्लफ्रेंडचे फोटो तूफान व्हायरल, जाणून घ्या तिच्या मृत्यूचे कारण
‘सतत अदलाबदली केली, नाहीतर मी आज ४९ नव्हे २४९ सामने खेळलो असतो,’ भारतीय फलंदाजाने मांडली व्यथा