Hardik Pandya : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली. संघाचे उपकर्णधारपद सलामीवीर शुबमन गिल याच्याकडे देण्यात आले आहे. असे असताना विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्या याला केवळ खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले. एकवेळ कर्णधार म्हणून चर्चा होत असताना आता त्याला उपकर्णधारपदही राखता आले नाही.
रोहित शर्मा याच्या टी20 निवृत्तीनंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून हार्दिकच्या नावाची चर्चा होत होती. परंतु, मुख्य प्रशिक्षण गौतम गंभीरने या पदासाठी सूर्यकुमार यादव याच्या नावाचा हट्ट धरला. त्यामुळे अखेर कर्णधारपदाची माळ सूर्याच्या गळ्यात पडली. दुसरीकडे भविष्याचा विचार करताना बीसीसीआय व मुख्य प्रशिक्षकाने उपकर्णधार म्हणून शुबमन गिल याचा पर्याय उभा केला. त्यामुळे केवळ वीस दिवसांपूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक केवळ खेळाडू म्हणून संघात सामील होईल.
संघनिवड होण्याआधीच हार्दिक याने आपण या दौऱ्यावरील वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे वनडे संघातील निवडीसाठी त्याचा विचार केला गेला नाही. अशात वनडे संघाचे उपकर्णधारपद देखील शुबमनकडे गेले.
टी20 विश्वचषकात हार्दिक याची कामगिरी जबरदस्त राहिली होती. तो भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला. तसेच फलंदाजीतही त्याने महत्वपूर्ण योगदान दिले होते. अंतिम सामन्यातही हेन्रिक क्लासेन व डेव्हिड मिलर यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवत त्याने भारताला विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला. याच काम केल्यानंतर तो टी20 क्रिकेट मधील पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू बनलेला.
हार्दिक साठी 18 जुलै ही तारीख निराशा आणणारी ठरली. भारतीय संघाचे उपकर्णधारपद त्याच्याकडून गेले. सोबतच त्यानंतर काही वेळात त्याने आपण आपली पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त होत असल्याचे जाहीर केले.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप
संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!