रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने बुधवारी (दि. ०४ मे) चेन्नई सुपर किंग्स संघाला १३ धावांनी पराभूत केले. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पराभूत होऊन चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. चेन्नईला पराभूत करण्यात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मोलाचा वाटा उचलला. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्याने ३ विकेट्स घेण्याची मोठी कामगिरी केली. मात्र, असे असूनही तो एका गोष्टीने खुश नाहीये. या गोष्टीचा उल्लेख त्याने सामन्यानंतर केला आहे.
हर्षल पटेलने (Harshal Patel) ४ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा दिल्या. यावेळी त्याने मोईन अली, रवींद्र जडेजा आणि ड्वेन प्रिटोरियस या ३ महत्त्वाच्या खेळाडूंना तंबूत धाडले. सामन्यानंतर नावडत्या गोष्टीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मला वाटते की, पहिल्या षटकात मी विकेटवर मारण्याचा प्रयत्न केलेला मंद गतीचा चेंडू फलंदाजांच्या बॅटवर लागला. मी माझ्या सिक्वेन्सिंगवर काम करत आहे. मी पुनरागमन करू शकलो याचा मला आनंद आहे. दोन्ही डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध मला बाहेर वाईड गोलंदाजी करण्यास सांगण्यात आले होते. तुम्हाला परिस्थितीचे भान असणे आवश्यक आहे. तसेच, फलंदाज काय करणार आहे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.”
हर्षल पटेलने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत १० सामने खेळताना ७.७८च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या आहेत. पुढे बोलताना हर्षल म्हणाला की, “मग पुढे काय करायचे, ते तुम्हाला माहीत आहे. या हंगामात मी आतापर्यंत यॉर्कर टाकलेला नाही, पण या स्पर्धेच्या अखेरीस मी यॉर्कर टाकण्याची आशा करतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) ८ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. यावेळी आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई (Chennai Super Kings) संघाला ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या. यामुळे चेन्नईला १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! एमएस धोनी बाद होताच विराटने दिली शिवी? कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
एमएस धोनीमुळेच चेन्नई प्लेऑफमधून गेली बाहेर? ‘या’ खेळाडूला बाहेर करणं पडलं महागात
भारतीय संघाने २०१९ विश्वचषक का गमावला? खुद्द युवराज सिंगने सांगितले कारण