Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संघाने २०१९ विश्वचषक का गमावला? खुद्द युवराज सिंगने सांगितले कारण

भारतीय संघाने २०१९ विश्वचषक का गमावला? खुद्द युवराज सिंगने सांगितले कारण

May 5, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/BCCI


सन २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकाचा उपांत्य सामना कोणत्याही भारतीय चाहत्याला आठवावा वाटणार नाही. कारण, या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला होता. या विश्वचषकात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत उपांत्य सामना गाठला होता. पावसामुळे विश्वचषकाचा उपांत्य सामना ९ आणि १० जुलै रोजी भारत आणि न्यूझीलंड संघात मॅनचेस्टर येथे खेळवला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारताला १८ धावांनी पराभूत करत विश्वचषकातून बाहेर केले होते. इतक्या शानदार प्रदर्शनानंतरही भारताला पराभवा कसा मिळाला, यामागील कारणांचा खुलासा माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने केला आहे.

माध्यमांशी बोलताना युवराज सिंगने (Yuvraj Singh) २०१९ विश्वचषकातून (T20 World Cup 2019) बाहेर झाल्यामुळे भारतीय संघाच्या (Team India) काही योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याच्या मते, २०१९ क्रिकेट विश्वचषकात भारताकडे चांगल्या रणनीतीची कमतरता होती. अनुभवहीन मधल्या फळीने विराट कोहली आणि त्याच्या संघाला निराश केले. युवराजचा असा विश्वास आहे की, विजय शंकर आणि रिषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन होते आणि त्यांना चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली नव्हती पाहिजे.

चांगल्या रणनीतीची कमतरता
यावेळी बोलताना युवराज संजय मांजरेकरांना म्हणाला की, “जेव्हा आम्ही २०११मध्ये विश्वचषक उंचावला, तेव्हा आम्हा सर्वांकडे फलंदाजी करण्यासाठी निश्चित जागा होती. मात्र, २०१९ विश्वचषकात मला असे जाणवले नाही. चांगल्याप्रकारे योजना आखण्यात आली नाही. जेव्हा आम्ही २००३ विश्वचषक खेळलो, तेव्हा माझ्याकडे, मोहम्मद कैप आणि दिनेश मोंगिया यांच्याकडे ५०-५० वनडे सामन्यांचा अनुभव होता.” वरील प्रतिक्रिया ही युवराजने स्पोर्ट्स १८ शोसोबत बोलताना दिली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

टी२० विश्वचषकात पुन्हा केली तीच चूक
मागील वर्षी टी२० विश्वचषकाचे आयोजन यूएईमध्ये झाले होते. भारतीय संघाला या विश्वचषकात खास कामगिरी करता आली नाही. तसेच, पहिल्या दौऱ्यातून बाहेर पडावे लागले. मागील ८ आयसीसी स्पर्धांमध्ये ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारत पहिल्याच दौऱ्यातून बाहेर पडला. युवराजचे मत आहे की, या विश्वचषकातही भारताने तीच चूक पुन्हा केली. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी निश्चित पाहिजे. टी२० लीगमध्ये खेळाडू मधल्या फळीत चांगली फलंदाजी करतात, पण टी२० विश्वचषकात असे करू शकले नाहीत.

युवराजची आंतरराष्ट्रीय कामगिरी
युवराजने ४० कसोटी, ३०४ वनडे आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत युवराजने ६२ डावात ३३.९२च्या सरासरीने १९०० धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ३६.५५च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या. तसेच, त्याने टी२०त २८.०२च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १७ शतके झळकावली आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीने बेंगलोरविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फोडले? म्हणाला, ‘गुणतालिकेऐवजी चुकांवर लक्ष देण्याची गरज’

अफलातून! वेगाने धावा करत असलेल्या पाटीदारचा काळ बनला चौधरी; चित्त्याच्या चपळाईने झेल घेत धाडले तंबूत

एमएस धोनीने बेंगलोरविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फोडले? म्हणाला, ‘गुणतालिकेऐवजी चुकांवर लक्ष देण्याची गरज’


ADVERTISEMENT
Next Post
MS-Dhoni-And-Virat-Kohli

लज्जास्पद! एमएस धोनी बाद होताच विराटने दिली शिवी? कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

Harshal-Patel

सामनावीर पुरस्कार पटकावूनही हर्षल पटेल स्वत:शीच का नाहीये खुश? म्हणाला, 'तुम्हाला भान असावे लागते'

Lucknow-Super-Giants

खेळाडूंच्या भूकेशी खेळतीये फुड डिलिव्हरी कंपनी; शुबमन गिलपाठोपाठ 'या' खेळाडूला दिला 'धोका'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.