नवी दिल्ली। ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील मालिकेदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने अर्धशतके ठोकत संघाचा विजयात मोलाचे योगदान दिले. परंतु क्षेत्रक्षणात मात्र, विराटसाठी ही मालिका अविस्मरणीय अशी ठरताना दिसत नाही. विराटला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानले जाते. परंतु मागील काही सामन्यांपासून तो सोपे सोपे झेलही सोडताना दिसत आहे. रविवारी (६ डिसेंबर) सिडनी येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडनेचा सोपा झेल सोडला. तरीही, त्याला या चेंडूवर बाद व्हावे लागले. भारतीय संघाचा माजी फलंदाज अजय जडेजाने विराटच्या या चुकांमागील कारण सांगितले आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना जडेजाने म्हटले की, “विराट कोहलीला मागील काही वर्षांमध्ये आपण काही असाधारण झेल झेलताना पाहिले आहे. जेव्हा त्याच्याकडे विचार करण्याचा वेळ असतो, तेव्हा मला वाटते की कधी-कधी गोष्टी निसटतात. मागील सामन्यात त्याच्याकडे आवश्यक वेळ होता आणि याचे फीटनेसशी कोणतेही देणं-घेणं नव्हते. मला वाटते की, तो त्या वेळेची वाट पाहत होता की, केव्हा हात त्याच्या आणि चेंडूच्या मध्ये येतोय.”
कोहली दिसला असंतुलित
पुढे बोलताना अजय जडेजाने म्हटले की, “आज त्याच्याकडे वेळ होता. परंतु तो झेल पकडणार होता, तेव्हा तो असंतुलित होता. जेव्हा तुम्ही सोप्यात सोपे झेल सोडणे सुरू करता, तेव्हा चेंडू तुमच्याकडे येताना एखाद्या बाँबप्रमाणे दिसतो.” त्याचबरोबर जडेजाने म्हटले की, विराटसाठी हे आवश्यक आहे की, त्याने लक्ष केंद्रित करावे. नाही तर सोपा झेलही कठीण दिसेल.
विशेष म्हणजे वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर वेडने शॉट खेळला, तेव्हा विराटने तो झेल पकडण्याचा प्रयत्न करताना चेंडू ३ वेळा खाली पडण्यापूर्वी हाताळला. यानंतर विराटने चेंडू पकडत यष्टीरक्षक केएल राहुलकडे फेकला आणि वेडला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग