काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका कर्णधार म्हणून विराट कोहली याची शेवटची (Virat Kohli) कसोटी मालिका ठरली. या मालिकेनंतर त्याने कर्णधारपदावरून माघार घेतली होती.
आता कसोटी संघाचा पुढील कर्णधार कोण? याबाबत अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (Kl Rahul), रिषभ पंत (Rishabh pant) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) यांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी, जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद का देऊ नये, याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
शोएब अख्तर सोबत बोलताना रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहला कर्णधारपद देण्याबाबत म्हटले की, “नाही, मी याबाबत कधीच विचार केला नाही. भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. एका वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाचे नेतृत्व करणं जरा कठीण आहे. वेगवान गोलंदाजाला कर्णधार होण्यासाठी त्याने अष्टपैलू खेळाडू असणं गरजेचं आहे. तसेच तो बॉब विलिससारखा असला पाहिजे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद केएल राहुलच्या हाती सोपवण्यात आले होते. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहला देण्यात आली होती. हा सामना भारतीय संघाने गमावला होता.
अशी शक्यता वर्तवली जात आहे की, भारतीय वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आता कसोटी संघाची जबाबदारी देखील रोहित शर्माला दिली जाऊ शकते. आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याचे वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी
हे नक्की पाहा :