लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएलच्या पुढील हंगामात संघाकडून खेळणार की नाही? यावर टीमचे मालक संजीव गोयंका यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पत्रकारांशी बोलताना, राहुल लखनऊ सुपर जायंट्स परिवाराचा सदस्य असल्याचं गोयंका म्हणाले. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर बोललं जात आहे की, राहुल आयपीएल 2025 मध्ये लखनऊकडूनच खेळेल.
केएल राहुलबाबत बोललं जात होतं की, तो दुसऱ्या टीममध्ये जाऊ शकतो. मात्र आता लखनऊच्या मालकांच्या या व्यक्तव्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जर लखनऊनं राहुलला रिटेन केलं, तर संघाला याचा फायदाच होऊ शकतो. या बातमीत आम्ही तुम्हाला असे 3 कारणं सांगणार आहोत, ज्यामुळे राहुललं लखनऊचा कर्णधार बनवणं संघासाठी योग्य निर्णय असेल.
(1) संघाला सांभळण्याची कला – केएल राहुल आता इतका अनुभवी बनला आहे, की त्याच्याकडे कोणताही संघ सांभाळण्याची कला आहे. जरी तो आतापर्यंत कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही, मात्र संघ कसा चालवायचा हे त्याला चांगलं माहित आहे. यामुळे लखनऊनं त्याला नक्कीच रिटेन करायला हवं.
(2) फलंदाजीत शानदार रेकॉर्ड – केएल राहुल टी20 फॉरमॅटचा शानदार फलंदाज आहे. त्याच्या नावे आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड्स आहेत. जर लखनऊनं त्याला रिलिज केलं, तर संघाला त्याच्याप्रमाणे दुसरा अनुभवी फलंदाज मिळणार नाही. केएल राहुलसारखा दुसरा भारतीय खेळाडू ऑक्शनमध्ये खरेदी करणं लखनऊसाठी खूप अवघड आहे.
(3) कर्णधारपदाचा दांडगा अनुभव – केएल राहुल अनेक वर्ष पंजाब किंग्जचा कर्णधार होता. आता गेल्या 3 हंगामांपासून तो लखनऊचा कर्णधार आहे. राहुलकडे नेतृत्वाचा दांडगा अनुभव असून, त्यानं वेळोवेळी भारतीय संघाचं कर्णधारपदही सांभाळलं आहे. अशा परिस्थितीत त्याच्यासारखा दुसरा कर्णधार शोधणं लखनऊसाठी सोपं जाणार नाही.
हेही वाचा –
लखनऊचा मेंटॉर बनताच झहीर खानची भाषा बदलली, इम्पॅक्ट प्लेअर नियमावर केलं सडेतोड वक्तव्य
आयपीएल 2025 मध्ये राहुल लखनऊकडूनच खेळणार? मालक संजीव गोयंका यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण
IPL 2025: संघ किती खेळाडूंना रिटेन करु शकणार? कधी येणार निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर