---Advertisement---

“गोलंदाजी द्यायची नव्हती तर संघात स्थान का दिले?” वेंकटेश अय्यरबाबत नेटकऱ्यांनी विचारले जाब

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 4:27 PM
Venkatesh Iyer
---Advertisement---

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. नुकताच या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात (sa vs Ind 1st odi) देखील भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात पराभूत होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यावर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, वेंकटेश अय्यरला (Venkatesh iyer debue) खेळवण्याबाबत देखील सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काय आहे नक्की प्रकरण चला जाणून घेऊया.

पहिल्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर चहूबाजूने टीका होत आहे. दरम्यान, या सामन्यात वेंकटेश अय्यरला गोलंदाजी न दिल्यामुळे देखील चाहते संतापले आहेत. अनेकांनी आता जाब विचारायला सुरुवात केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेंकटेश अय्यरला वनडे पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. वेंकटेश अय्यर एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे त्याला ही संधी देण्यात आली आहे.

आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नव्हता, म्हणून वेंकटेश अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, पहिल्या वनडे सामन्यात त्याला एकही षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला बोलावले नाही. एकीकडे भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद करण्यास अपयशी ठरत होते, अशा परिस्थितीत केएल राहुलने वेंकटेश अय्यरला गोलंदाजी द्यायला हवी होती, असे अनेकांचे म्हणणे आहे.

https://twitter.com/Loyalsachfan01/status/1483769607446220801

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना २९६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रस्सी वॅन डर ड्यूसेनने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली होती, तर टेंबा बावुमाने ११० धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ५१ आणि शार्दुल ठाकूरने नाबाद ५० धावांचे योगदान दिले. परंतु, भारतीय संघाला ५० षटकांअखेर अवघ्या २६५ धावा करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या :

धक्कादायक! भारताचे सहा क्रिकेटर कोरोना पॉझिटीव्ह, स्वतः प्रशिक्षकांवर खेळाडूंना पाणी पाजण्याची आली वेळ.

व्वा शिखी भाई, ऐसा रोका की कॅमेरा में भी नहीं दिख रखा’; पंतची मजेशीर बडबड स्टंप माईकमध्ये कैद

महत्वाच्या बातम्या :

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---