---Advertisement---

जसप्रीत बुमराहवर सर्वाधिक वर्कलोड; आकडे स्पष्ट सांगतात विश्रांतीची गरज

On: शनिवार, जून 28, 2025 9:21 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मात्र हे काम भारतासाठी सोपं नसेल, कारण एजबेस्टनच्या मैदानावर भारत आजवर इंग्लंडला पराभूत करू शकलेला नाही.

यासोबतच एक मोठी चिंता म्हणजे जसप्रीत बुमराहचा दुसऱ्या टेस्टमधून विश्रांतीसाठी विचार केला जात आहे. टीम मॅनेजमेंट त्याच्या वर्कलोडचा विचार करून त्याला या सामन्यात खेळवण्याची घाई करणार नसल्याची चर्चा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमधील 7 दिवसांचा गॅप असूनही बुमराहला विश्रांती का दिली जातेय, यावर अनेक दिग्गज आणि चाहत्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत.

तुम्हाला माहिती असावं की, 2024 पासूनच्या रेड-बॉल क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक ओव्हर्स टाकणारा जलदगती गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह आहे. 1 जानेवारी 2024 पासून त्याने एकूण 410.4 ओव्हर्स टाकले आहेत, जे कोणत्याही दुसऱ्या वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त आहेत.

त्याच्यामागोमाग ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क (362.3 ओव्हर्स) आणि पॅट कमिन्स (359.1 ओव्हर्स) आहेत. मोहम्मद सिराजनेही बुमराहइतकेच म्हणजे 15 टेस्ट खेळून 355.3 ओव्हर्स टाकले आहेत, पण विकेट्समध्ये बुमराहने स्पष्ट आघाडी घेतली आहे. बुमराहने या काळात 78 बळी घेतले, तर इंग्लंडचा गस अ‍ॅटकिंसन दुसऱ्या स्थानावर असून त्याने 328 ओव्हर्समध्ये 55 विकेट्स घेतल्या आहेत.

फक्त वेगवान गोलंदाजांमध्येच नाही, तर संपूर्ण भारतीय गोलंदाजीमध्येही बुमराहने सर्वाधिक ओव्हर्स टाकले आहेत. त्याच्या पाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने 400.1 ओव्हर्स टाकले आहेत. यावरून स्पष्ट होते की, भारताच्या गोलंदाजीचा कणा सध्या बुमराहच आहे.

2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहने सलग 5 कसोट्या खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तो दुखापतीला सामोरा गेला होता. त्यामुळे यावेळी संघ आणि बुमराह दोघंही तीच चूक टाळण्याच्या मूडमध्ये नाहीत.

दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराहचा खेळणे अद्याप निश्चित नसले तरी त्याच्या वर्कलोडचा विचार करता, हा निर्णय योग्य ठरू शकतो. मात्र भारताला जर मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर त्यांच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराहविना जिंकण्याची मोठी कसोटी असेल. एजबेस्टनमध्ये भारताचा इतिहास विचारात घेता, सामना नक्कीच खडतर असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---