वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. शिखर धवनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल केला गेला. मागील सामन्यात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज आवेश खान याच्याजागी प्रसिद्ध कृष्णा याला पुन्हा संघात स्थान दिले गेले.
Captain Shikhar Dhawan wins the toss and we will bat first in the final ODI.
Live – https://t.co/KZQ1JeiHBK #WIvIND pic.twitter.com/TQkk3EfSIL
— BCCI (@BCCI) July 27, 2022
पोर्ट ऑफ स्पेन येथील या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून वेस्टइंडीज संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप देण्याच्या उद्देशाने भारतीय संघ उतरला. पहिले दोन सामने जिंकून भारताने आधीच मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे या अखेरच्या सामन्यात ईशान किशन व पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, शिखर धवनने केवळ आवेश खान याला वगळून प्रसिद्ध कृष्णा याला पुन्हा एकदा संघ स्थान दिले. या मालिकेसाठी उपकर्णधर म्हणून नियुक्त केलेल्या रवींद्र जडेजाची दुखापत बरी न झाल्याने तो या सामन्यातही सहभागी होऊ शकला नाही.
A look at our Playing XI for the final ODI.
One change for #TeamIndia. Prasidh Krishna comes in for Avesh Khan.
Ravindra Jadeja was not available for selection for the 3rd ODI since he is still not 100 percent fit.The medical team will continue to monitor his progress.#WIvIND pic.twitter.com/4bkh524SBu
— BCCI (@BCCI) July 27, 2022
दुसरीकडे मालिका गमावलेल्या यजमान संघाने एकाच वेळी संघात तीन बदल केले. अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डर, किमो पॉल व केसी कार्टी यांना संघात जागा देण्यात आली. त्यामुळे रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड व अल्झारी जोसेफ यांना संघाबाहेर व्हावे लागले.
अखेरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन-
भारत- शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज- शाई होप, ब्रँडन किंग, केसी कार्टी, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), काइल मायर्स, जेसन होल्डर, कीमो पॉल, अकील होसेन, हेडन वॉल्श, जेडेन सेल्स.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला