वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमानांचा ६८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर पाहुणा संघ आता दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. दुसरीकडे यजमान संघही हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या टी२० सामन्यात दोन्ही संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतात, हे आपण जाणून घेऊया.
अशी असेल सलामी जोडी-
या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव हा पुन्हा सलामीला दिसू शकतो. अगदीच बदल करायचा झाल्यास मधल्या फळीत खेळलेला रिषभ पंत याला सलामीवीर म्हणून बढती देण्यात येऊ शकते. यजमान संघासाठी कायले मायर्स व ब्रेंडन किंग सलामी देताना दिसतील.
मधल्या फळीत या खेळाडूंना मिळेल संधी-
मधल्या फळीत भारतीय संघ पुन्हा एकदा श्रेयस अय्यरला संधी देईल. हार्दिक पंड्या हादेखील संघात असेल. फिनीशरची भूमिका दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजा हे बजावतील. दुसरीकडे वेस्ट इंडीज संघात निकोलस पूरन, रोवमन पॉवेल, शिमरन हेटमायर मधल्या फळीत खेळताना दिसतील. ओडेन स्मिथ आणि जेसन होल्डरच्या रूपाने वेस्ट इंडीजकडे दोन तगडे अष्टपैलू आहे.
असे असेल गोलंदाजी आक्रमण-
भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार व रवीचंद्रन अश्विन करतील. त्याला रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग साथ देतील. वेस्ट इंडीज संघात अकील होसेन फिरकीची जबाबदारी सांभाळेल. वेगवान गोलंदाजीची धुरा ओबेद मेकॉय, अल्झारी जोसेफ व किमो पॉल पुन्हा एकदा सांभाळताना दिसतील.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर
माजी क्रिकेटरचा भारताच्या संघ निवडकर्त्यालाच दम! म्हणाला, ‘टी२० विश्वचषकासाठी योग्य टीम निवड’