---Advertisement---

बापरे! एकाच सामन्यात तब्बल ४६ षटकार…

On: गुरूवार, फेब्रुवारी 28, 2019 5:13 PM
---Advertisement---

विंडीज विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारी(27 फेब्रुवारी) चौथा वनडे सामना पार पडला. या वनडे सामन्यात इंग्लंडने 29 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांची तुफानी फलंदाजी पहायला मिळाली. त्याचबरोबर प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांची बरसातही पहायला मिळाली.

या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 46 षटकार मारले. त्यामुळे एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रमही झाला आहे. याआधी एका वऩडे सामन्यात सर्वाधिक षटकार 2013 मध्ये बंगळूरु येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मारण्यात आले होते. त्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 38 षटकार मारले होते.

बुधवारी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 418 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये इंग्लंडने 24 षटकार मारले. तर इंग्लंडने दिलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांनीही आक्रमक फलंदाजी करताना 22 षटकारांची बरसात केली. मात्र त्यांचा डाव 48 षटकातच 389 धावांवर संपुष्टात आला.

याचबरोबर इंग्लंडने या वनडे सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. या आधी हा विक्रम विंडीजच्या नावावर होता.

विशेष म्हणजे हा विक्रम विंडीजने याच चालू वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात केला होता. विंडीजने पहिल्या वनडे सामन्यात 23 षटकार मारले होते.

बुधवारी झालेल्या विंडीज-इंग्लंड सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार इयान मॉर्गन(103) आणि जॉस बटलरने(150) तर विंडीजकडून ख्रिस गेलने(162) शतकी खेळी केली.

या खेळाडूंनी मारले बुधवारी झालेल्या सामन्यात षटकार-

इंग्लंड-

4 षटकार – जॉनी बेअरस्टो

2 षटकार – ऍलेक्स हेल्स

6 षटकार – इयान मॉर्गन

12 षटकार – जॉस बटलर

विंडीज-

14 षटकार – ख्रिस गेल

1 षटकार – जॉन कॅम्पबेल

4 षटकार – डॅरेन ब्रावो

1 षटकार – शिमरॉन हेटमेयर

2 षटकार – कार्लोस ब्रेथवेट

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी-कोहलीने एकाच सामन्यात केला हा खास पराक्रम

या कारणामुळे एमएस धोनीच आहे टीम इंडियाचा षटकार किंग…

कर्णधार कोहलीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी नकोशी गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment