भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये आहे. उभय संघात एकूण 10 सामने खेळले जाणार अशून त्यातील दोन सामने कसोटी आहेत. कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी (21 जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू झाला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याचे नाव नव्हते. बीसीसीआयने शार्दुलला संघाबाहेर बसवण्याचे कारणही स्पष्ट केले आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील पहिला कसोटी सामना डॉमिनिकामध्ये खेळला गेला होता. या सामन्यात डाव आणि 141 धावांनी भारताला विजय मिळला होता आणि शार्दुल ठाकूर देखील या संघाचा भाग होता. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला संघात निवडले गेले नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून अशी माहिती दिली गेली आहे की, शार्दुल ठाकूरच्या डाव्या ग्रोईनला दुखापत झाली असून वेदना होत आहेत. याच कारणास्तव दुसऱ्या कसोटीत निवडण्यासाठी तो उपलब्ध नव्हता.
दरम्यान, मुकेश कुमार भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 308 वा खेळाडू ठरला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतासाठी या कसोटी सामन्यात मुकेश कुमार सोबत मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट हे वेगवान गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा ही जोडी संघात कायम आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात 8, तर जडेजाने 5 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत देखील या दोघांकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे.
पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंक्या 4 बाद 288 धावा होती. कर्णधार रोहित आणि यशस्वी जयसवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिला. रोहितने 80, तर जयसवालने 57 धावांची खेळी केली. विराट कोहली पहिल्या दिवसाखेर 87* धावांसह खेळपट्टीवर कायम होता. रविंद्र जडेजा यानेही 36* धावा केल्या आहेत. विराटच्या चाहते आपल्या आवडत्या खेळाडूचे शतक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा शुबमन गिल मात्र अवघ्या 10 धावांवर बाद झाला. (WI vs IND । This is the reason for Shardul Thakur’s expulsion, important information has come out)
महत्वाच्या बातम्या –
‘माझी आई फक्त तुला पाहायला आलीये, माझी इच्छाये तू…’, विंडीज खेळाडूची विराटला खास विनंती
‘सचिननंतर विराटच…’, किंग कोहलीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही वेस्ट इंडिजचा दिग्गज