भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात खेळत आहे. मोठ्या काळाच्या प्रतिक्षेनंतर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली असून चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दुसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन घोषित होताच सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी विश्रांती दिली गेली. या दोघांच्या जागी संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांना संघात निवडले गेले. सॅमससने शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर 2022मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तसेच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सॅमसनने जानेवारी 2003 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. 2015 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर 2021 पर्यंत सॅमसनला एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. वनडे पदार्पणानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध तो कारकिर्दीतील 12 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.
तब्बल पाच महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या सॅमसनसाठी चाहते आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छा येत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि मिम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. (Fans showered memes on Sanju Samson as he was picked in the playing XI)
Sanju Samson Play but Rohit and Virat not play 😴#INDvsWI #SanjuSamson #ViratKohli𓃵 pic.twitter.com/KxwovmWHnH
— Abhi 🚩 (@IG_aabhi_x7) July 29, 2023
Sanju Samson in the playing 11
But Rohit and virat out 😅Rohit to ICT fans : pic.twitter.com/YVmbmkmNwW
— 𝐌𝐫. 𝐌𝐞𝐦𝐞𝐫 𝐍𝐢𝐤𝐡𝐢𝐥 (@Nikhil_memes) July 29, 2023
Finally Sanju Samson getting chance pic.twitter.com/a2sWTXC7zM
— 🎶 (@JayaramaRaaju) July 29, 2023
SANJU SAMSON IS PLAYING pic.twitter.com/j3tf4xfHSs
— Pr𝕏tham. (@77thHundredWhen) July 29, 2023
This is a big game for Sanju Samson. If he wants to cement his place in Indian team, Should perform today. pic.twitter.com/D7KXNJDmDy
— ANSHUMAN🚩 (@AvengerReturns) July 29, 2023
दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अलिक अथनाझे, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
महत्वाच्या बातम्या –
“ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरून खेळतोय”, इंग्लंडच्या दिग्गजाची ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर जहरी टीका
भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार जेम्स अँडरसन, स्वतः सांगितला फ्युचर प्लॅन