---Advertisement---

इंग्लंडनंतर वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवण्यासाठी भारतीय संघ सज्ज, पाहा प्रॅक्टिस सेशनचा खास व्हिडिओ

On: गुरूवार, जुलै 21, 2022 11:53 AM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. संघाला २२ जुलैपासून वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. शिखर धवन या मालिकेत भारताच्या कर्णधाराची भूमिका पार पाडेल. मालिका सुरू होण्याच्या काही दिवस आधी संघ त्रिनिदादमध्ये दाखल झाला असून गुरुवार (२१ जुलै) संघाने सरावाला सुरुवात केली. 

भारतीय संघाला या दौऱ्यात वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. दौऱ्याच्या सुरुवातील वेस्ट इंडीज आणि भारतीय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पाडले. त्यानंतर उभय संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळळी जाईल. २२ जुलैला खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी संघाचे पहिले सराव सत्र झाले. बीसीसीआयच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून या सराव सत्रातील व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

दौऱ्याचा एकंदरीत विचार केला, तर एकदिवसीय मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्धणाराच्या भूमिकेत दिसते. परंतु टी-२० मालिकेसाठी कर्णधार रोहित संघासोबत जोडला जाईल. खराब फॉर्ममधील विराट कोहलीने या दौऱ्यातून माघार घेतली असून, जसप्रीत बुमराहला निवडकर्त्यांकडून विश्रांती दिली गेली आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

इंग्लंडनंतर वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवण्यासाठी भारतीय संघ सज्ज, पाहा प्रॅक्टिस सेशनचा खास व्हिडिओ

निवृत्ती घेतल्यानंतर बटलरने केला बेन स्टोक्सला सलाम! म्हणाला, ‘त्याने जे केले ते…’

टीम इंडियाचा धोका वाढला, पाकिस्तान हळू हळू बनवतंय विश्वचषकात भक्कम जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---