एखादा खेळाडू वाईट फॉर्ममध्ये असला की त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जातात. त्यातच संघामध्ये युवा खेळाडू आणि वरिष्ठ खेळाडू यांच्यात स्पर्धा सुरू असते. अशाच परिस्थितीतून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या या जात आहे. याच्याशी संबधित वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय वनडे मालिकेसाठीचा कर्णधार शिखर धवन यानेही त्याच्या फॉर्मवरून झालेल्या टीकांचे स्पष्टीकरण दिले आहे.
सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला, “टीका ऐकण्यात काही नवीन राहिले नाही. गेल्या दहा वर्षापासून मी टीकाच ऐकत आलो आहे. लोक बोलत राहतात, मी उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यांचे जर ऐकले असते तर आजपर्यंत इथवर आलोच नसतो.”
“माझ्याकडेही अनुभव असल्याने मला कसलीही काळजी नाही. माझ्या खेळामध्ये कोणत्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, याचा विचार करण्यापलीकडे बाकी कोणत्याही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाही,” असेही धवनने पुढे म्हटले आहे.
🗣️ 🗣️ "I am very excited to lead the ODI side." @SDhawan25 sums up how he is looking forward to captain #TeamIndia in the #WIvIND ODI series. 👌 👌 pic.twitter.com/MWXzTkLJ13
— BCCI (@BCCI) July 22, 2022
“मी एका सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. मी आता इथे आहे ते माझ्या चांगल्या कर्मामुळेच. युवा खेळाडूंना चांगले विचार देण्याचा माझा हेतू आहे,” असेही धवन म्हणाला आहे.
धवनला मागील वर्षीच्या टी२० विश्वचषकामध्ये वाईट कामगिरीमुळे संघात जागा मिळाली नव्हती. तसेच त्याला आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही संघात निवडले गेले नव्हते. तसेच सध्या भारतीय संघात मोठ्या प्रमाणात युवा खेळाडूंनी आपली जागा निर्माण केली आहे. अशातच धवनसमोर इशान किशन, रूतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनकडून कडवी प्रतिस्पर्धा मिळणार आहे.
त्याचबरोबर धवनची संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यात वनडे मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद भुषविले होते. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती.
धवनने ऑक्टोबर २०१०मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. वनडे पदार्पणाच्या सामन्यातच धवन शुन्यावर बाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटीमध्ये पदार्पण करताना १८७ धावांची खेळी केली. आतापर्यंत त्याने १५२ वनडे सामन्यात ४५.१७च्या सरासरीने ६३२५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १७ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने त्याच्या १००व्या वनडे सामन्यात १०९ धावा केल्या होत्या. कारकिर्दीतील १००वा वनडे सामना खेळताना शतकी खेळी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WIvIND: ‘या’ भारतीयांनी सर्वाधिक कॅरेबियन फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता; दिग्गजांसह युवाही सामील
वेस्ट इंडीजच्या प्रशिक्षकांनी केला रणनीतीचा खुलासा, फलंदाजी आणि गोलंदाजीत ‘हे’ असेल टार्गेट
पहिल्या वनडेत उतरताच ‘टीम इंडिया’ची नजर दोन विश्वविक्रमांवर; पाकिस्तानला पछाडण्याची संधी