मागील काही काळापासून एक नाव खूपच चर्चेत आहे. ते म्हणजे सरफराज खान होय. सरफराज खान याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही त्याला मागील तीन वर्षांपासून सातत्याने दुर्लक्षित केले जात आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात युवा यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांना सधी मिळाली. मात्र, सरफराजकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी न दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला पाँटिंग?
आयसीसीसोबत बोलताना रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने सरफराज खान (Sarfaraz Khan) याला सातत्याने दुर्लक्षित केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, “मला सरफराजसाठी थोडे वाईट वाटते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 80ची सरासरी असूनही त्याला कसोटी संघात जागा मिळत नाहीये. मात्र, ते काही कारणांमुळे सरफराजच्या जागी इतर खेळाडूंना सातत्याने निवडत आहेत.”
यशस्वी जयसवालचा चाहता बनला पाँटिंग
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 171 धावांची शानदार खेळी साकारणाऱ्या यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्यावर पाँटिंग फिदा झाला. तो म्हणाला की, “यशस्वी जयसवालची यावेळची आयपीएल खास होती. तो आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर रात्रीत सुपरस्टार झाला आहे. प्रत्येकाला माहिती होते की, तो एक पात्र खेळाडू आहे. मात्र, जे मी यावर्षी आयपीएलमध्ये पाहिले, ते लाजवाब होते.”
सरफराजची प्रथम श्रेणी कारकीर्द
सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने शानदार प्रदर्शन करत आहे. त्याने आतापर्यंत एकूण 38 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 56 डावात 76च्या सरासरीने 3511 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 13 शतके आणि 9 अर्धशतकेही झळकावली आहेत. यामध्ये नाबाद 301 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सरफराजने 26 सामने खेळत 39च्या सरासरीने 469 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. (wi vs ind former cricketer ricky ponting is not happy with sarfaraz khan continous ignorance by indian selectors)
महत्वाच्या बातम्या-
IPL Auctionमध्ये खरेदी न केल्याने RCBवर संतापलेला चहल, बोलणंही केलं होतं बंद; स्वत:च केला खुलासा
‘शंकाच नाही, तो महानच…’, पहिल्या कसोटीत 12 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचं कुणी गायलं गुणगान?