भारतीय संघाचा वरच्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसने लागोपाठ दोन अर्धशतक ठोकले आहेत. रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७१ चेंडूत ६३ धावांचे योगादन दिले. पण या प्रदर्शानवर त्याचे समाधान झाले नाहीये. शतक करता आले नाही, म्हणून श्रेयस नाराज असल्याचे समोर येत आहे.
रविवारी खेळला गेलेला वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना भारताने २ विकेट्सने जिंकला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) प्रमाणेच संजू सॅमसनने (५४) देखील या सामन्यात अर्धशतक ठोकले. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५४ धावा करणाऱ्या श्रेयसला या सामन्यात शतकीय खेळी करता आली नाही, यामुळे तो निराश आहे.
सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, “मी आज ज्या धावा केल्या, त्यावर मी खुश नाहीये. पण ज्या पद्धतीने मी बाद झाले, त्यामुळे नाखुश आहे. मी संघाला सहजपणे लक्ष्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होते. मी चांगली सुरुवात केली, पण दुर्देवाने माझी विकेट गमावली. आशा आहे पुढच्या सामन्यात यापेक्षा चांगले प्रदर्शन करेल आणि शतक बनवू शकेल.”
पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील श्रेयस दुर्दैवाने झेलबाद झाला होता. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “मागच्या वेळीही मझा उत्कृष्ट झेल घेतला गेला होता. नक्कीच मी असे म्हणणार नाही की, मी माझी विकेट सहज गमावली, पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मी त्याला शतकामध्ये बदलले पाहिजे होते. पण संघाच्या विजयात योगदान देऊन मी खुस आहे. प्रत्यक्षात हे चांगले आहे की, मी सलग दोन सामन्यात अर्धशतक केले आहे. मला हे प्रदर्शन शतकात बदलायचे होते, कारण मी चांगली सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची सुरुवात नेहमी मिळत नसते. माझ्याकडे आज खूप चांगली संधी होती.”
अय्यरच्या मते तिसरा क्रमांक हे फलंदाजीसाठी सर्वोत्तम स्थान आहे. तो म्हणाला की, “हा फलंदाजीसाठी एक सर्वश्रेष्ठ क्रमांक आहे. तुम्हाला कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर उतरण्याची वेळ येऊ शकते. संघाने जर विकेट्स लवकर गमावल्या, तर तुम्हाला लवकर खेळपट्टीवर यावून डावही सांभाळावा लागू शकतो. मला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आवडते.”
दरम्यान, उभय संघातील या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी वेस्ट इंडीजकडून ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.४ षटकात आणि ८ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. उभय संघातील तिसरा सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बायोपिकचे पोस्टर लाँच करताच अख्तरने विराटबद्दल केले मोठे विधान, म्हणाला ‘तो एक…..’
एका सामन्यात खेळलेले चार विकेटकीपर, एक पठ्ठ्या ४५ व्या वर्षी ग्लोव्हज घालून उतरला मैदानात
क्षणाक्षणाला बदलत असलेल्या सामन्यात कशी झालेली गुरू द्रविडची अवस्था? उपकर्णधारानेच केला खुलासा