न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्कॉट स्टायरिसने भारताचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्टायरिसच्या मते सूर्यकुमार यादव जर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात नसला, तर विरोधी संघांसाठी ही मोठी आनंदाजी गोष्ट असेल.
भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह, अशा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. वरिष्ठांच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारची जबाबदारी वाठली आहे. एक वृत्तसंस्थेशी बोलत असताना स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याला एक खास प्रश्न विचारला गेला. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळवले जाईल का ?, असा हा प्रश्न होता.
यावर बोलताना स्टॉक स्यायरिस म्हणाला की, “या जगात खूप कमी लोक आहेत, जे सूर्यकुमारचे माझ्यापेक्षा मोठे चाहते आहेत. मी तुम्हाला सध्या सांगू शकतो की, जर तो संघात नसेल, तर जगभरातील संघ आनंदात जल्लोष करतील. ही माझ्यासाठी आनंदाची बातमी होती, जेव्हा सर्वजण म्हणाले की, तो सर्वात आधी निवडल्या जाणाऱ्या लोकांपैकी एक पाहिजे. मला वाटते, त्याच्याकडे सामना जिंकण्याची खरी क्षणता आहे. तुम्हालाही तेच हवे आहे, तुम्हाला असे खेळाडू पाहिजेत, जे स्वतःच्या जोरावर सामना जिंकू शकतील.”






