---Advertisement---

वेस्ट इंडीजच्या पॉवर हिटर्सचा भारत कसा करणार सामना? द्रविडने दिल्या आहेत खास टिप्स

On: शुक्रवार, जुलै 29, 2022 4:15 PM
team-India-rahul-dravid
---Advertisement---

वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कमागिरी केली. शिखर धवन याच्या नेतृत्वातील भारताने या मालिकेत यजमान वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (०-३) दिला. आता उभय संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेपेक्षा टी-२० मालिकेत वेस्ट इंडीज भारताला कडवे आव्हान देईल, अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने भारतीय खेळाडूंना महत्वाचे मार्गदर्शन केल्याचे समोर येत आहे. 

भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वच्या सर्व सामने जिंकले, पण पहिल्या दोन सामन्यात संघाला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला होता. तसेच वेस्ट इंडीज संघाकडे असे काही खेळाडू आहेत, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटवू शकतात. आगामी टी-२० मालिकेत अशा खेळाडूंचा वेस्ट इंडीजला फायदा होईल, ही शक्यता नाकारता येणार नाही.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि एकेकाळचा महान फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) याला वेस्ट इंडीज संघाची हीच खासियत चांगल्या प्रकारे जाणतो. याच कारणास्तव द्रविडने उभय संघातील टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना खास सल्ले दिले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सराव सत्रातील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये द्रविड खेळाडूंसोबत बोलताना पाहिले जाऊ शकते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले गेले आहे की, “आम्ही पुन्हा आलो आहोत. टी-२० साठी सराव सुरू आहे.” दरम्यान, टी-२०  मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) खेळला जाईल.

https://www.instagram.com/p/Cgj5w61LulR/?utm_source=ig_web_copy_link

भारताचे दिग्गज जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या दोघांना वेस्ट इंडीज दौऱ्यातून विश्रांती दिली गेली आहे. तसेच एकदिवसीय मालिकेत खेळलेला युझवेंद्र चहल देखील टी-२० मालिकेत खेळताना दिसणार नाही. दुसरीकडे भारतासाठी चांगली बाब ही आहे की, नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील संघात पुनरागमन करेल. तसेच हार्दिक पंड्या, रिषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार या महत्वाच्या खेळाडूंचेही संघात पुनरागमन होईल.

आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाची ही चौथी टी-२० मालिका आहे. सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळलेल्या टी-२० मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर खेळलेल्या आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका भारताने जिंकल्या. आता संघ वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली जाणारी टी-२० मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार

यंदा टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज सज्ज! सामन्याचा लावलाय तडाखा, असे असेल वेळापत्रक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणाऱ्या सर्व भारतीयांसाठी विराटचे खास ट्वीट, ‘अशा’ शब्दात दिल्या शुभेच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---