येत्या 9 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात होणआर आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. अशात आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा 37 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून तो ‘पदार्पण’ करत असल्याचे म्हणाला आहे. चला जाणून घेऊया नेमका विषय आहे तरी काय.
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने आयपीएल 2022नंतर भारतीय संघाच पुनरागमन केले होते. तो टी20 विश्वचषक 2022मध्येही संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतर तो भारतीय संघाचा भाग बनला नाहीये. अशात त्याने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ट्वीटमध्ये काय म्हणाला कार्तिक?
दिनेश कार्तिक हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील कसोटी मालिकेत दिसू शकतो. त्याने नुकतेच एक ट्वीट करत म्हटले आहे की, “मी भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. अच्छा… आता हे पुन्हा घडत आहे!” कार्तिकच्या या ट्वीटवरून असे म्हटले जात आहे की, तो पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करत आहे. मात्र, प्रत्यक्षात खेळणार नसून या मालिकेत दिनेश कार्तिक समालोचन (Dinesh Karthik Commentary) करताना दिसू शकतो. त्याने यापूर्वी 2019च्या विश्वचषकातही समालोचन केले आहे.
Made my Test debut in India against Australia…
Well…It's happening again! ☺️ #Excited #INDvAUS— DK (@DineshKarthik) February 2, 2023
कार्तिकने आजपर्यंत एकदाही कसोटी सामन्यात समालोचन केले नाहीये. त्यामुळे त्याने त्याच्या ट्वीटमध्ये पदार्पणाचा उल्लेख केला आहे. कार्तिकला या मालिकेत स्टार स्पोर्ट्सच्या टीममध्ये सामील केले जाऊ शकते. कार्तिकच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 26 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 25च्या सरासरीने एकूण 1025 धावा केल्या आहेत. कार्तिकने नोव्हेंबर 2004मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. तसेच, 2018मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
आयपीएल 2023मध्ये खेळताना दिसेल
आयपीएल 2023मध्ये दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळताना दिसेल. आयपीएल 2022मध्ये दिनेश कार्तिक आरसीबीचा (RCB) भाग होता. आयपीएल 2022मध्ये त्याने 16 सामन्यात 55च्या सरासरीने 330 धावा चोपल्या होत्या. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारतीय संघात जागा मिळाली होती. (wicket Keeper Batsman dinesh karthik part of border gavaskar series as commentator india vs australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! शुबमन गिलच्या खोलीत घुसून किशनने वाजवली कानाखाली; चहलही बघतच राहिला; व्हिडिओ व्हायरल
ख्रिस्टियनच्या दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! 9 टी20 विजेतेपदांसह संपविला प्रवास