क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने मोठा निर्णय घेतला आहे. ईशान किशन दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नाहीये. त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याला ईस्ट झोनने प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्याने हा प्रस्ताव का नाकारला, याची अद्याप पुष्टी झाली नाहीये. खरं तर, ईशान किशनची निवड जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात झाली होती. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
विशेष म्हणजे, भारतीय संघाला जुलै महिन्यात वेस्ट इंडिज संघाचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यापूर्वी दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीचे आयोजन केले आहे. यासाठी संघांची घोषणा केली जात आहे. बुधवारी (दि. 14 जून) ईस्ट झोनने संघाची घोषणा केली.
‘त्याला खेळायचं नाहीये’
ईस्ट झोनच्या निवड समितीच्या एका सदस्याने माध्यमांना सांगितले की, “तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होता. आम्ही झोनल निवड समितीचे संयोजक देबाशीष चक्रवर्ती यांना विचारले की, आम्ही किशनची निवड करू शकतो का? यावर चक्रवर्तींनी ईशानशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्हाला सांगितले की, त्याला दुलीप ट्रॉफी खेळण्यात रस नाहीये. आम्हाला हे सांगण्यात आले नाहीये की, दुखापतीमुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे त्याला खेळायचे नाहीये. फक्त एवढंच सांगितलं की, त्याला खेळायचे नाहीये.”
अभिमन्यू ईश्वरनच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा
ईशान किशन (Ishan Kishan) याने नकार दिल्यानंतर त्रिपुराचे निवडकर्ते जयंत डे यांनी वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याच्याशी संपर्क साधला. साहानेही दुलीप ट्रॉफी युवा खेळाडूंच्या चांगल्या भविष्यासाठी आहे आणि कोणत्याच युवा खेळाडूची संधी त्याला हुकवायची नसल्याचे सांगत या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. त्यामुळे अभिषेक पोरेल याला संघात सामील केले. ईस्ट झोन संंघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन करताना दिसणार आहे. (wicketkeeper Batsman ishan kishan opts out of duleep trophy one month ahead of wi tests)
ईस्ट झोन संघ
अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), शांतनू मिश्रा, सुदीप घरामी, रियान पराग, ए मजूमदार, बिपिन सौरभ, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), के कुशाग्र (यष्टीरक्षक), एस नदीम (उपर्णधार), शाहबाज अहमद, मुकेश कुमार, आकाश दीप, अनुकुल रॉय, एम मुरा सिंह, ईशान पोरेल
महत्वाच्या बातम्या-
प्रवीण आमरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! थेट अमेरिकेतून आलं बोलावणं, लगेच वाचा
जस्ट अश्विन थिंग्स! TNPL सामन्यात मागितला रिव्ह्यूचाच रिव्ह्यू, व्हिडिओ पाहाच