भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यानंतर मायदेशी परतला आहे. या अंतिम सामन्यात त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. भारतीय संघाच्या या रणनीतीवर सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर या महान भारतीय क्रिकेटपटूंनी देखील प्रश्न उपस्थित केला. कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या अश्विनला बाहेर ठेवल्याचा फटका भारतीय संघाला बसला व त्यांना पराभूत व्हावे लागले. अशात आता मायदेशी परतल्यानंतर अश्विन याने मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ 12 जून रोजी मायदेशी पोहोचला. त्यानंतर आता अवघ्या दोन दिवसातच अश्विनने पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या तमिळनाडू प्रीमियर लीग या टी20 लीगच्या हंगामात तो आता डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. अश्विन 14 जून रोजी होणाऱ्या संघाच्या सामन्यात मैदानावर खेळताना दिसेल.
ड्रॅगन्स आपल्या मोहिमेची सुरुवात B11C त्रिची यांच्याविरुद्धच्या या सामन्यातून करतील. अश्विन 2016 पासून या संघाचा भाग आहे. मागील हंगामात तो आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे केवळ एकच सामना खेळू शकलेला. यावेळी महिनाभर कोणताही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम नसल्याने तो जास्तीत जास्त सामने संघासाठी खेळू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी त्याने चौदा गडी बाद केलेले. तत्पूर्वी, टींएनपीएल लिलावात तो डिंडीगुल ड्रॅगन्स संघाच्या टेबलवर देखील दिसून आलेला.
डिंडीगुल ड्रॅगन्स संघ: आदित्य गणेश (यष्टीरक्षक), आर अश्विन, वरुण चक्रवर्ती, बाबा इंद्रजीत, सुबोध भाटी, अद्वैत शर्मा, विमल खुमर, पी विघ्नेश, धिलेपन, अफान खादर, एस अरुण, रोहन भुत्रा, व्हीपी दिरान, हेमंत कुमार, किशोर, बूपथी कुमार, पी सरवण कुमार, सी सरथ कुमार
(Ravichandran Ashwin Will Play For Dindigul Dragons In TNPL 2023)
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
VIDEO । एका चेंडूत खर्च केल्या 18 धावा, भारतीय गोलंदाजाचा नकोसा विक्रम!