भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत पाहुण्या संघाचा पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली. आता या दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये संजू सॅमसनची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. रिषभ पंतला विश्रांती दिल्याने सॅमसनला सुरुवातीपासूनच प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा होती. या कारणास्तव संजू देखील त्याच्या पूर्ण तयारीमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याला राजस्थान रॉयल्सचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मदत करत आहेत. ज्यांनी भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद मिळवून दिले आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियात सामील होण्यापूर्वी संजू सॅमसन त्याच्या आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या परफॉर्मन्स सेंटरमध्ये तयारी करण्यात व्यस्त आहे. फ्रेंचाइजीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये संजू फलंदाजी करताना अनेक जबरदस्त शॉट्स खेळताना दिसत आहे. या दरम्यान राहुल द्रविडही त्याच्यावर लक्ष ठेवून संजूच्या शॉट्सचे कौतुकही केले. फलंदाजी करताना काही हवाई शॉट्स खेळण्याबरोबरच संजू स्ट्रेट ड्राईव्ह आणि रिव्हर्स स्वीपही खेळत आहे. अशाप्रकारे संजूने त्याच्याकडे समाविष्ट असलेल्या सर्व शॉट्सचा जोमाने सराव करत आहे.
View this post on Instagram
बांग्लादेशविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी आपला संघ जाहीर केला होता. ज्यामध्ये कसोटी मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आले आहे. याच कारणामुळे शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचीही निवड झालेली नाही. टी20 संघात अभिषेक शर्मा हा एकमेव स्पेशालिस्ट सलामीवीर आहे. या कारणामुळे संजूला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या टी20 मध्ये शुबमन गिलच्या जागी त्याने डावाची सुरुवात केली. या कारणामुळे आता तो पुन्हा एकदा ओपनिंग करताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा-
IND vs BAN: या दोन खेळाडूंची क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी, विशेष मेडलनं सन्मानित
बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली नाही, मुंबईच्या फलंदाजानं इराणी चषकात शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर!
शतक थोडक्यात हुकलं, पण संघासाठी संकटमोचक बनून आला अजिंक्य रहाणे!