---Advertisement---

बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देईल, इतकी सुंदर आहे टीम इंडियाचा अष्टपैलू शिवम दुबेची पत्नी, पाहा फोटो

On: रविवार, जुलै 18, 2021 3:45 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा 16 जुलै रोजी विवाह झाला आहे. शिवमने आपली मैत्रीण अंजुम खान सोबत लग्न केले आहे. अंजुम खान हे एक मुस्लिम धर्मीय मुलगी आहे. अंजुम खान ही मूळची उत्तर प्रदेशमध्ये राहते. त्याच बरोबर तिचे शिक्षण अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मधून झाले असून फाइन आर्ट्स मधून पदवी मिळवली आहे.

अभिनयाची आहे आवड
अंजुम खानला अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही खूप रस आहे. अंजुम खानने हिंदी सिरीयल व्यतिरिक्त म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे.

https://www.instagram.com/p/B2BRbapHexK/

इंस्टाग्रामवर असते नेहमी सक्रीय
अंजुम इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटोज आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. अंजुम खान ही सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूडमधल्या कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.

https://www.instagram.com/p/BkjYubagVJo/

शिवम आणि अंजुमची पहिली भेट
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आणि पत्नी अंजुम खान यांची पहिली भेट कधी झाली याचा अजूनही खुलासा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध कधी सुरु झाले, याचाही अजून खुलासा झालेला नाही.

https://www.instagram.com/p/CRbVUQfr7zj/

दुवा मागितल्यानंतर गोंधळ माजला
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा हिंदू आहे, तर पत्नी अंजुम खान ही मुस्लिम धर्माची आहे. त्यामुशे बऱ्याच लोकांना ही गोष्ट आवडलेली नाही आणि या जोडीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली. शिवमच्या दुवा मागण्यावर ही बर्‍याच लोकांनी आक्षेप घेतला. तर बरेच लोकांनी आपली प्रतिक्रिया देत असेही विचारले की, त्यांने लग्न केला आहे की निकाह? मात्र, या टीकेला मागे सारत शिवम आणि अंजुमने आपल्या प्रेमाला यशस्वी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘हा’ फलंदाज भरुन काढणार एबी डिवीलियर्सची जागा! अवघ्या ७ वनडेत ठोकलीत २ द्विशतके

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन महारथींचं टीम इंडियाच्या वनडे संघात पदार्पण!

राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---