अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करत तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यास क्रिकेट ही अपवाद नाही. क्रिकेट चाहत्यांना भीती वाटतेय की आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे काय होईल? प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, स्टार क्रिकेटर राशिद खान आणि मोहम्मद नबी आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकतील की नाही? या सर्व प्रश्नांवर सनरायझर्स हैदराबादकडून उत्तर आले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी राजीनामा देऊन देश सोडला आहे. या संकटामुळे जगभरातील प्रवासी उड्डाणे काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आली आहेत. रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाणे होऊ शकले नाही.
हैदराबाद संघाचे कार्यकारी अधिकारी के शनमुगम यांनी म्हटले आहे की, खेळाडूंशी याविषयी बोलले गेलेले नाही. ते म्हणाले, “आतापर्यंत आम्ही खेळाडूंशी अफगाणिस्तानमध्ये सध्या काय चालले आहे, याबद्दल बोललेलो नाही. परंतु, दोन्ही खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध असतील, हे निश्चित आहे.” येत्या 31 ऑगस्टला सनरायझरर्स हैद्राबादचा संघ दुबईसाठी रवाना होईल यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने खुलासा केला आहे की, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आपल्या देशातील परिस्थितीमुळे चिंतेत आहे. कारण रशीद आपल्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यास यश येत नाही.
रशीद यूकेमध्ये सुरू झालेल्या ‘द हंड्रेड क्रिकेट लीग’ स्पर्धेत तो ट्रेंट रॉकेट्सकडून खेळतोय. पीटरसन पुढे म्हणाला, “अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही याबद्दल बरीच चर्चा केली आहे आणि रशीद खूप काळजीत आहे. तो आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास असमर्थ आहे. त्याच्यासाठी ही वेळ खूप कठीण आहे. रशीदच्या इतक्या दबावाखाली राहून देखील तो ‘द हंड्रेड’ स्पर्धेत खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. हे खूप प्रेरणादायी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२१ पूर्वी यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना केलं मुक्त, ‘हे’ आहे मोठे कारण
भारीच! ऐतिहासिक विजयानंतर विराटसेनेला लॉर्ड्स ग्राउंडकडूनही मिळाल्या खास शुभेच्छा






