भारतीय संघाने बुधवारी (7 डिसेंबर) बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारला. मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यात देखील भारताला पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बुधवारच्या पराभवानंतर भारतीय संघाने मालिका देखील गमावली. पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची एक खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
भारततीय संघाला जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मते भारताला या मालिकेपूर्वी एक सक्षम वनडे संघ मिळेल. पुढच्या वर्षी भारतामध्ये आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला वनडे फॉरमॅटमध्ये असा संघ हवा आहे, जो विश्वचषक जिंकण्याची धमक ठेवत असेल. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने मागच्या महितन्यात न्यूझीलंडविरुद्ध, तर चालू महिन्यात बांगलादेशविरुद्ध वडने मालिका खेळली. या दोन्ही मालिकांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. यावरून संघातील वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
संघातील वरिष्ठ खेळाडू मागच्या काही महिन्यांमध्ये नेहमीच दुखापतग्रस्त राहिले आहेत. द्रविडला याविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “आमच्या दृष्टीने पाहिले, तर या फॉरमॅटमध्ये खेळणे सोपे नाहीये. आमचा जवळपास सर्व संघच उपस्थित नव्हता. जानेवारीमध्ये मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत संपूर्ण संघ उपस्थित असेल, अशी अपेक्षा आहे. पण ही गोष्ट खेळाडूंच्या दुखापतीवर अवलंबून असेल. आम्हाला आयपीएलआधी 9 वनडे सामने (तीन न्यूझीलंडविरुद्ध, तीन श्रीलंकेविरुद्ध आणि तीन ऑस्ट्रेलियाविरुद्ध) खेळायचे आहेत आणि या सामन्यांंमध्ये आम्हाला एक स्थिर संघ मिळेल, अशीच अपेक्षा आहे.”
“मागच्या दोन वर्षात आम्ही टी-20 फॉरमॅटला अधिक प्राथमिकता दिली आहे. कारण आपल्याला दोन विश्वचषक खेळायचे होते. पुढच्या आठ-दहा सामन्यांमध्ये आमची प्रथमिकता वनडे फॉरमॅटला असेल. या फॉरमॅटमध्ये संघाला रुळवणे सोपो नसते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांतीही मिळणार आहे. कारण संघाला कसोटी सामने देखील खेळायचे आहेत.”
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू मागच्या काही महिन्यांमध्ये सतत दुखापतग्रस्त होताना दिसले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. दुखापतीमुळे बुमराह आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकात खेळू शकला नाही. अष्टपैलू रविंद्र जजेडा आणि मोहम्मद शमी देखील बहुतांश सामने आणि मालिकांमध्ये संघातून बाहेरच राहिले आहेत. असे असले तरी, आगामी वनडे विश्वचषकासाठी भारताचे हे सर्व वरिष्ठ खेळाडू तंदुरुस्त असतील आणि अप्रतिम प्रदर्शन करती अशी अपेक्षा प्रशिक्षक द्रविडसह सर्वच चाहत्यांना देखील आहे. (Will all India’s senior players play together in January? Hints given by Rahul Dravid.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा, बीसीसीआयच्या सुत्रांकडून माहिती
भल्याभल्यांना पुरून उरलाय रोहित शर्मा, बनला 500 सिक्स मारणारा पहिला भारतीय