मुंबई । एमएस धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परंतु तरीही तो त्याच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पुढील दोन वर्षांमध्ये धोनी आयपीएल खेळणार असल्याचे सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, 2022 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतानाही दिसू शकेल. 2019 च्या विश्वचषकानंतर धोनी गेल्या वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. सध्या तो आयपीएलची तयारी करत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार विश्वनाथन म्हणाले, “आम्हाला धोनी विषयी कोणतीही चिंता नाही. आमची अशी अपेक्षा आहे की धोनीने 2020 आणि 2021 हे दोन्ही हंगाम खेळले आणि कदाचीत 2022 च्या हंगामातही तो सीएसकेकडून खेळेल.”
धोनी 2008 पासून सीएसकेचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने तीन वेळा आयपीएल आणि दोनदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवले आहे. विश्वनाथन म्हणाले की, “धोनीने झारखंडमध्ये इनडोअर नेटमध्ये सराव सुरू केल्याची मला माहिती मिळाली आहे. पण आम्हाला आमच्या कर्णधाराची चिंता करण्याची गरज नाही. त्याला आपल्या जबाबदाऱ्या कळतात.”
सुरेश रैना आणि धोनीसह सीएसकेच्या संघाचे सदस्य 14 ऑगस्ट रोजी चेन्नईत एकत्र येतील. त्यानंतर ते 21 ऑगस्टला युएईला रवाना होईल. बीसीसीआयने कोरोना विषाणूमुळे खेळाडूंसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. लीग दरम्यान सर्व खेळाडू जैविक वातावरणात राहतील. स्पर्धेचे सुरुवातीचे काही सामने प्रेक्षकांविना असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर मॅच खेळणारा आयपीएलमधील एकमेव संघ, कारण होते…
ऍडम गिलख्रिस्टने अखेर मान्य केलेच, भारताच्या ‘या’ दोघांनी आम्हाला फारच त्रास दिला
स्वातंत्र्य दिनी सचिन तेंडुलकर आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार
ट्रेंडिंग लेख –
सीपीएल २०२०: ४ परदेशी खेळाडू जे बनू शकतात सीपीएलच्या आठव्या हंगामाचे स्टार
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते