विश्वचषक 2023 स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची अवस्था खूपच वाईट आहे. इंग्लंड संघ पहिला सामना न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या तीनपैकी दोन सामने गमावल्याने इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. येथून आणखी एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्यास ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप मागे राहू शकतात. अशा परिस्थितीत इंग्लंड संघ आपला मॅच विनर खेळाडू बेन स्टोक्स याची मैदानात येण्याची वाट पाहत आहे.
इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सांगितले की, आमच्या वैद्यकीय कर्मचार्यांना काही काळापासून विश्वास आहे की, आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सला मैदानात उतरवू शकतो. मॅथ्यू मॉट पुढे म्हणाले, “गेल्या 24 तासात मला त्याच्या फिटनेसशी संबंधित कोणतेही अपडेट मिळालेले नाही, पण त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर लक्ष्य असेल. याबाबत आम्हाला पूर्ण आशा आहे की, मैदानात परतण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते तो पूर्णपणे करू शकतो.”
बेन स्टोक्सने गेल्या वर्षीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो फक्त कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्येच खेळत होता. मात्र, 2023 च्या विश्वचषकासाठी त्याने आपला विचार बदलला आणि वनडे क्रिकेट खेळण्याची घोषणा केली. असे असले, तरीही दुखापतीमुळे तो आत्तापर्यंत 2023च्या विश्वचषकातील एकही सामना खेळू शकलेला नाही.
इंग्लंडला मागील विश्वचषक (2019) चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. यानंतर 2022 च्या टी-20 विश्वचषकातही त्याच्याच बळावर इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. अशा परिस्थितीत आता इंग्लंडच्या आशा पुन्हा एकदा या दिग्गज अष्टपैलू खेळाडूवर टिकून आहेत. स्टोक्सच्या पुनरागमनाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता असून तो पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. (Will Ben Stokes play against South Africa The coaches gave the information read)
हेही वाचा-
विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय
महत्त्वाच्या सामन्यात अफगाणिस्तानने जिंकला टॉस, न्यूझीलंड संघात ‘हा’ मोठा बदल; पाहा Playing XI