---Advertisement---

धोनीशिवाय संपणार का सीएसकेच्या पराभवाचे सत्र? पाहा राजस्थान विरुद्धचा ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड

On: सोमवार, मार्च 30, 2026 5:18 PM
---Advertisement---

येत्या IPL 2026 ची धमाकेदार सुरुवात झाली असून, पहिले दोन सामने अत्यंत अटीतटीचे आणि प्रेक्षणीय ठरले आहेत. आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर आमनेसामने येतील. दोन्ही संघांसाठी मागील सीझन विसरण्याजोगा ठरला होता, त्यामुळे आता दोन्ही संघ विजयाने नवीन हंगामाची सुरुवात करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. CSK आणि RR यांच्यात मोठा इतिहास राहिला आहे, चला तर मग त्यांच्या ‘हेड टू हेड’ रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

​IPL मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धचे मागील काही सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी फारसे चांगले राहिलेले नाहीत. जर दोन्ही संघांमधील गेल्या ५ सामन्यांचा विचार केला, तर त्यापैकी चार सामन्यांत चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. फक्त एकदाच CSK ने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला आहे. आता ३० मार्चला होणाऱ्या सामन्यात चेन्नईच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत, कारण महेंद्रसिंग धोनी या सामन्यात खेळणार नाही. ‘काफ स्ट्रेन’ (पिंडलीच्या स्नायूंमध्ये ओढ लागणे) मुळे तो दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत राजस्थानविरुद्धच्या पराभवाचे सत्र संपवणे चेन्नईसाठी सोपे नसेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---