भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खूप प्रभावी फलंदाजी केली आहे. त्याने याआधीही भारतीय संघासाठी नेहमीच चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. आता श्रेयस अय्यर बद्दल एक मोठी गोष्ट समोर येत आहे. एका रिपोर्ट्स नुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ श्रेयसला लवकरच सेंट्रल क्रिकेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये संधी देऊ शकतो. क्रिकेट बोर्डाने मागील वर्षी श्रेयसला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केले होते. पण आता तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तसेच त्याची सध्याची फलंदाजी शानदार आहे.
मागील वर्षी श्रेयस अय्यरला बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार आता परत श्रेयसचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये पुनरागमन होऊ शकते. श्रेयसला कोणत्या कॅटेगरी मधील कॉन्ट्रॅक्ट मिळेल हे अजून स्पष्ट झालं नाही. बीसीसीआय अक्षर पटेल, के एल राहुल आणि रिषभ पंत यांनाही कॉन्ट्रॅक्ट मध्ये प्रमोट करू शकते. भारतीय खेडूंमधील के एल राहुल सध्या अ कॅटेगरी मध्ये आहे, तसेच अक्षर आणि रिषभ ब कॅटेगरी मध्ये आहेत. बीसीसीआय मधील सर्वोत्तम अ कॅटेगरी मध्ये फक्त चार खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा या यादीत सामील आहेत.
तसेच अ कॅटेगरी मध्ये अजून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के एल राहुल आणि शुबमन गिल व तसेच रविचंद्रन अश्विन सुद्धा आहे. पण त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
श्रेयस अय्यरने मागच्या सात डावात प्रभावीपणे खेळामध्ये प्रदर्शन केले आहे. त्याने या दरम्यान 4 अर्धशतके केली आहेत. श्रेयसने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात 45 धावा केल्या. न्यूझीलंड विरुद्ध त्याने 79 धावा केल्या. याचबरोबर पाकिस्तान विरुद्ध सामन्यात त्याने 56 धावा करत खेळामध्ये सातत्य राखलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत एका सामन्यात त्याने 78 धावांची पारी खेळली. हा सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात आला होता. तसेच इंग्लंड विरुद्ध नागपुर मध्येही त्याने 59 धावा केल्या होत्या.
हेही वाचा
‘खेळताना रोजा ठेवावा लागतो?’ शमीच्या वादात रोहितवर टीका करणारी शमा मोहम्मद उतरली!
टीम इंडियानं आतापर्यंत खेळल्या 13 आयसीसी फायनल्स, तर इतक्या वेळा कोरलं ट्राॅफीवर नाव
बीसीसीआयनं स्लीव्हलेस जर्सीवर घातली बंदी, खेळाडूंना शिस्त लागण्यासाठी घेतला मोठा निर्णय?