इंग्लंडमध्ये सध्या कौंटी क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. कौंटी चॅम्पियनशिप २०२१ अंतर्गत तिथे सामने खेळवले जात आहेत. इंग्लंडमधील स्थानिक खेळाडूंसह विविध देशांतील इतर खेळाडू देखील यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना देखील चुरशीचे आणि दर्जेदार सामने पाहायला मिळत आहेत.
खेळाडू देखील आपले अव्वल दर्जाचे प्रदर्शन करून लक्ष वेधून घेत आहेत. या प्रदर्शनाचे विविध व्हिडिओ कौंटी संघ आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. आत्ताही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात सरे संघाच्या एका फिरकीपटूच्या चेंडूने सगळ्यांनाच अचंबित केले आहे.
भन्नाट फिरकीने फलंदाज ‘क्लीन बोल्ड’
ग्लूस्टेशायर आणि सरे या दोन कौंटी संघांमधील सामन्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या सामन्यात सरे संघाचा फिरकीपटू विल जॅकने टाकलेल्या चेंडूची चर्चा सर्वत्र होते आहे. त्याने ग्लूस्टेशायर संघाच्या पहिल्या डावात हा भन्नाट फिरकी घेणारा चेंडू टाकला होता. या चेंडूने ग्लूस्टेशायरचा फलंदाज मॅथ्यू टेलरला क्लीन बोल्ड केले.
विल जॅकने मॅथ्यू टेलरला ऑफस्टंपच्या बर्याच बाहेर टप्पा पडणारा चेंडू टाकला होता. त्यावेळी टेलरला हा चेंडू स्टंपला लागणार नाही असे वाटल्याने त्याने हा चेंडू सोडून दिला. मात्र आश्चर्यकारक पद्धतीने या चेंडूने जवळपास चक्क ९० अंशाची फिरकी घेतली आणि हा चेंडू थेट स्टंपवर जाऊन लागला. हा चेंडू स्टंपला लागल्यावर कित्येक काळ फलंदाजाला देखील आपण बाद झालो, यावर विश्वास बसत नव्हता. तर मैदानावरील पंच देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले. या चेंडूचा व्हिडिओ कौंटी चॅम्पियनशिपच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Phwoar, what a ball this is, @Wjacks9! 😍
Watch @surreycricket attack Gloucestershire live here ➡️ https://t.co/z08OcjygZE#LVCountyChamp pic.twitter.com/ujEQOFPl3k
— Vitality County Championship (@CountyChamp) May 29, 2021
दरम्यान, ग्लूस्टेशायर आणि सरे संघांमधील या सामन्यात सरे संघाने पहिल्या डावात ४७३ धावा काढल्या होत्या. यात हाशिम आमलाच्या १७३ धावांच्या खेळीचा मोलाचा वाटा होता. या प्रत्युत्तरात ग्लूस्टेशायर संघ पहिल्या डावात १५८ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर सरे संघाने त्यांना फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दुसर्या डावात ग्लूस्टेशायर संघाने ५ गडी गमावून १२४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला व्हायचे होते क्रिकेटपटू; धवनसोबत खेळला आहे क्रिकेट, विराटचाही चांगला मित्र
केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने
बुमराहच्या पोस्टवर अक्षर पटेलची मजेशीर कमेंट, मिर्झापूरचा संवाद वापरत म्हणाला…