---Advertisement---

स्मिथ ऐवजी बटलर बनणार कर्णधार? राजस्थान रॉयल्सने दिलंय ‘हे’ उत्तर

---Advertisement---

शुक्रवारी(16 ऑक्टोबर) दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे त्याच्याऐवजी ओएन मॉर्गनकडे कोलकाताच्या नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली. हे वृत्त आल्यानंतर काहीवेळातच आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथही कर्णधार सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली. पण काही वेळातच लगेचच राजस्थान रॉयल्सने या अफवा असल्याचे म्हटले आहे.

राजस्थान रॉयल्सने काही ट्विट्स करत या चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. या ट्विट्सद्वारे त्यांनी असेही सांगितले आहे की स्मिथच कर्णधारपदी कायम रहाणार आहे. तसेच राजस्थान रॉयल्सचे सीओओ जॅक लश मॅक्रम यांनीही ट्विट करत बटलर कर्णधार होण्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1317045572239462400

https://twitter.com/JakeLushMcCrum/status/1317035665721352192

https://twitter.com/rajasthanroyals/status/1317036219444858880

नक्की कुठून सुरु झाली चर्चा – 

झाले असे की राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान एक ट्विट केला होता. यात जॉस बटलर कप घेऊन बसला आहे. त्या कपवर ‘वर्ल्ड बेस्ट बॉस (जगातील उत्तम बॉस) असे लिहिले आहे. त्यामुळे या ट्विटचा अर्थ बटलर राजस्थानचा नवा कर्णधार होणार असल्याचा अनेकांनी काढला. त्यामुळे स्मिथ कर्णधारपद सोडणार असल्याच्या आणि बटलर राजस्थानचा कर्णधार बनणार असल्याच्या चर्चेला उधाण आले.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1317010888138747905

https://twitter.com/adityakumar480/status/1317027840664031232

https://twitter.com/Aryansrkian/status/1317039280837914624

https://twitter.com/rj_aru/status/1317031402114670593

https://twitter.com/kannappaashwin/status/1317026692041408513

https://twitter.com/Sidharth1998dec/status/1317033429788131329

स्मिथची कर्णधार म्हणून खराब कामगिरी

सध्या स्टिव्ह स्मिथ राजस्थानचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली यंदा राजस्थानने खास कामगिरी केलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 8 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने पराभूत झाले आहेत. तसेच स्मिथही फलंदाजीत पहिल्या 2 सामन्यांनंतर खास कामगिरी करु शकला नाही.

राजस्थानने याआधीही हंगामाच्या मध्येच केला आहे नेतृत्वबदल – 

मागीलवर्षी राजस्थानने आयपीएलचा 12 वा हंगाम अर्धा संपलेला असताना अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरुन काढले होते. त्याच्याऐवजी स्मिथकडे त्यांनी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळीही रहाणेची कर्णधार म्हणून खराब कामगिरी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार

व्हिडिओ : ‘नाश्त्यात नशीब खाऊन आला आहात’ स्वतःच्याच फलंदाजीवर क्रिकेटपटूने केले समालोचन

रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे राग आला होता, दिनेश कार्तिकने केला खुलासा

ट्रेेंडिंग लेख –

-टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण

नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---