---Advertisement---

दुःखद ! आर अश्विनच्या संघसहकाऱ्याने घेतला जगाचा निरोप

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 8:16 PM
---Advertisement---

तामिळनाडूचा 35 वर्षीय फिरकीपटू एमपी राजेशचे सोमवारी (5 ऑक्टोबर) अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या अचानक झालेल्या मृत्यूने भारतीय क्रिकेटला हादरवून टाकले. भारतीय संघाचा फिरकीपटू आणि एमपी राजेशचा मित्र आर अश्विनने त्याच्या मृत्यूबद्दल ट्विटरवर दुःख व्यक्त केले आणि त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

राजेशने 2017 मध्ये तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले होते. या लीगमध्ये त्याने शानदार गोलंदाजी करून सर्वांनाच प्रभावित केले होते.

तमिळनाडू संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या एमपी राजेशच्या मृत्यूनंतर आर अश्विनला खुप दुःख झाले आहे. हे दोघेही खूप जवळचे मित्र होते. आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्स संघाकडून खेळत असलेल्या आर अश्विनने ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, “आरआयपी एमपी राजेश. तू या जगातून निघून गेला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सामन्यानंतर मी तुझ्याबरोबर संभाषण करायचो. तुझ्यासोबत घालवलेला वेळ मी कधीच विसरणार नाही.”

राजेशने तामिळनाडूमधील टीएनपीएल टी20 लीगमध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय त्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन आणि तामिळनाडूच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या खराब फलंदाजीनंतर चाहत्याने साधला; फलंदाजावर निशाना; म्हणाला, सीबीआय चौकशी
केदार जाधवला सामनावीराचा पुरस्कार द्या;, चेन्नईच्या पराभवानंतर माजी खेळाडूची खोचक टीका
सिंह म्हातारा झालाय, शिकार करणं विसरला नाही;, धोनीचा कॅच पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---