---Advertisement---

दुसऱ्या कसोटीपूर्वी विराटच्या फलंदाजांना सुचना, अशी करा फलंदाजी

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 7:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी भारतीय फलंदाजांना अनेक सूचना केल्या आहेत. यावेळी त्यानी फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करू नये असे सूचित केले आहे.

काल (24 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 विकेट्सने जिंकत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या पराभवानंतर विराट म्हणाला की, “या सामन्यात खेळताना आपण वापरलेली फलंदाजीची शैली बदलावी लागेल. मला नाही वाटत की, सतर्कतेने किंवा खूप सावधानीने खेळल्यास काही फायदा होईल. शिवाय असे खेळल्यास आपण आपले शॉट खेळू शकणार नाही.”

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात खेळताना भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने अत्यंत बचावात्मक फलंदाजीचा वापर केला. त्यामुळे त्याने 81 चेंडूत अवघ्या 11 धावांची खेळी केली. संपूर्ण डावादरम्यान फलंदाजीच्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही. पुजारा दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना मधे त्याला 28 चेंडूत एकही धाव घेता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या मयंक अगरवालला आक्रमक खेळी करावी लागली.

त्यामुळे विराट पुढे म्हणाला की, “फलंदाजाला एकही धाव घेता आली नाही. तरीही, तो अशा चेंडूची वाट पाहात आहे, जो स्वत: येऊन तुम्हाला बाद करेल. असे वागणे मला अजिबात आवडत नाही”

विराटला असे वाटते की काहीवेळेस आक्रमक पवित्राही घेतला पाहिजे. विराट म्हणाला “मी परिस्थितीला जाणून घेऊन खेळतो. यावेळी जर खेळपट्टीवर गवत असेल तर मी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे मी माझ्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो. ” असे याविषयी बोलताना विराट म्हणाला.

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान क्राईस्टचर्च येथे होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---