भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना नुकताच सिडनी येथे पार पडला असून, आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष ब्रिस्बेन येथे 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याकडे वळले आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असून तिसरा सामना अनिर्णीत झाल्याने ब्रिस्बेन कसोटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांना दुखापतींचे ग्रहण लागले आहे.
भारताकडून रवींद्र जडेजा व हनुमा विहारी या कसोटीतून बाहेर झाले आहेत, तसेच जसप्रीत बुमराह देखील दुखतापग्रस्त आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचा विचार केला असता त्यांचा सलामीवीर विल पुकोस्की हा देखील दुखापतग्रस्त असून त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
विल पुकोस्की तिसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. पुकोस्कीबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने अधिकृत माहिती दिली असून, त्यानुसार पुकोस्कीला पुढील दोन दिवस दुखापतीतून सावरण्याची पुरेपूर संधी दिली जाईल. मात्र पुकोस्की जर तंदुरुस्त होण्यात अपयशी ठरला तर मार्कस हॅरीसला संघात संधी मिळू शकते.
पुकोस्कीने सिडनी येथील कसोटी सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्या डावातच त्याने शानदार 62 धावांची खेळी केली होती. यापूर्वीही सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला अशा असेल की पुकोस्की चौथ्या कसोटी सामन्यासाठी पूर्णतः तंदुरुस्त होवून मैदानात उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रविंद्र जडेजा म्हणाला, ‘मी लवकरच…’