चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. खुद्द बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी याबाबत बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.
पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी व्हावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बोर्ड भारताच्या सामन्यांचं नियोजनही करत आहे. ‘पीसीबी’चं म्हणणं आहे की, पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यामुळे भारतानंही पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हावं.
या प्रकरणावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, “पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सरकारच्या परवानगीनंतरच भारतीय संघ पाकिस्तानला पाठवला जाईल. चॅम्पियन ट्रॉफीच्या बाबतीत सरकार आम्हाला जे सांगेल ते आम्ही करू. जेव्हा सरकार आम्हाला परवानगी देईल तेव्हाच आम्ही आमची टीम पाठवतो. आम्ही सरकारच्या निर्णयाचं पालन करू.”
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे. पीसीबीनं स्पर्धेच्या आयोजनाची तयारीही सुरू केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. मात्र स्पर्धेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, उभय संघांनी शेवटची मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली होती. त्यावेळी पाकिस्तानची टीम भारतात आली होती. गेल्या वर्षी भारतानं पाकिस्तानमधील आशिया चषक सामन्यांसाठी आपला संघ पाठविण्यास नकार दिला होता. शेवटी आशियाई क्रिकेट परिषदेला या स्पर्धेसाठी संकरित मॉडेल स्वीकारावं लागलं, ज्या अंतर्गत बहुतेक सामने श्रीलंकेत आयोजित केले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल
रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’, कॅच घेण्यासाठी चक्क 21 मीटर धावला! पाहा आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम झेल
चेन्नईचे 3 सामने बाकी, आता प्लेऑफचं समीकरण काय? टॉप-४ मध्ये स्थान कसं निश्चित होईल? जाणून घ्या