आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी मोजून काहीच तासांचा कालावधी सध्या शिल्लक आहे. तसेच यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मध्ये होणार आहे. मात्र याआधी मोठ्या प्रमाणावर उलथा पालथ झालेली पहायला मिळाली आहे. असे असताना आयपीएलच्या विजेता बाबत दिग्गजाने भविष्यवाणी केली आहे. त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
याबरोबरच पहिल्या सामन्यापूर्वीत दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने आयपीएल जेतेपदाचं नाव जाहीर केलं आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ विजेते होतील असा अंदाज एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी वर्तवला आहे. तसेच यानंतर बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला आहे की, आता मुलींनी जे काही केले ते अभिमानस्पद आहे. मात्र आता आरसीबीच्या मेन्स संघ देखील हा कामगिरी करू शकतो.
आयपीएलमधील दहा संघांमध्ये तगडे खेळाडू असून सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपली प्लेइंग इलेव्हन कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे आरसीबीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच मागच्या 16 पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची झोळी रिती राहिली होती. त्यामुळे 17 व्या पर्वात आरसीबी जेतेपद मिळवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 20, 2024
दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2009, 2011, 2016 या तीन पर्वात अंतिम फेरीत पोहोचला होता. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स, 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि 2016 मध्ये सनराईजर्स हैदराबादने पराभूत केलं होतं.