7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) ला सुरुवात होत आहे. हा मान मिळवण्यासाठी टीम इंडिया सध्या प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिलक वर्मा (Tilak Verma) हा टी-20 संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण सध्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे फिट व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे.
तिलकच्या तब्येतीकडे सर्वांचे लक्ष असतानाच, त्याने एक व्हिडिओ शेअर करून तो वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याचे संकेत दिले आहेत. तिलक वर्माने स्वतःच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट दिली आहे. नुकताच त्याचा ‘BCCI CoE’ मध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो फलंदाजीसोबतच गोलंदाजीचाही सराव करताना दिसला.
त्याने क्रिकेट किटसोबतचा एक फोटो पोस्ट करून आपण पूर्णपणे ‘फिट’ असल्याचे सुचवले आहे. 3 फेब्रुवारी 2026 रोजी टीम इंडियाचे सर्व खेळाडू मुंबईत एकत्र जमणार आहेत. अशा परिस्थितीत तिलक वर्मा तिथे भारतीय संघात सामील होण्याची दाट शक्यता आहे.






