भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या महत्वाच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी खराब प्रदर्शन केले होते. त्यातल्या त्यात हार्दिक पंड्यावर चाहत्यांनी बरीच टीका देखील केली होती. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर खराब प्रदर्शन केले होते. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर हार्दिक पंड्याने एक ट्विट केले आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या म्हणाला की, टी२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर चाहत्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी तो दुप्पट मेहनत घेईल. भारतीय संघ यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ टप्प्यातूनच बाहेर पडला आहे. हार्दिकने संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त पुनरागमन करेल असे आश्वासन देखील दिले आहे.
पंड्याने ट्विट केले की, ‘आम्हाला आमची टी२० विश्वचषक मोहीम अशी अपेक्षित नव्हती. आम्ही कमी पडलो पण चाहत्यांनी दाखवलेला पाठिंबा आणि विश्वास परत मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत करू. स्टेडियम आणि देशातून आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.’
This wasn’t how we wanted our World Cup campaign to go. We fell short but we will work twice as hard to repay the faith and support shown to us by our fans. Thank you to everyone who cheered us on at the stadiums and everyone back home 🙏 🇮🇳 pic.twitter.com/n8ZnHhEm6H
— hardik pandya (@hardikpandya7) November 9, 2021
सोमवारी (८ नोव्हेंबर) झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यातील साखळी सामन्यात भारतीय संघाने नामिबियाचा ९ गडी राखून पराभव केला होता. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १३२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघाने १५.२ षटकांत एक गडी गमावून सहज १३३ धावांचे लक्ष्य गाठले. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पुन्हा एकदा ५९ चेंडूत ८६ धावांची शानदार भागीदारी केली. भारताकडून फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीने प्रशिक्षक रवी शास्त्रींना मिठी मारत दिला भावपूर्ण निरोप, व्हिडिओ व्हायरल
‘हिटमॅन’ची कमाल फिल्डींग! रोहित शर्माने सूर मारत पकडला अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल