माजी जागतिक नंबर १ व्हिक्टोरिया अझारेंका विम्बल्डनद्वारे पदार्पण करणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. पुनरागमनाची बातमी तिने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.
२७ वर्षीय अझारेंका म्हणते, “मी सध्या सर्व करत असून मला मी स्पर्धात्मक टेनिस खेळायला तयार आहे असं वाटत. त्यात माझा मुलगा लिओलाही लंडन आणि विम्बल्डन पाहायची इच्छा आहे. ”
” मी लवकरच माझं वेळापत्रक विम्बल्डनपूर्वी फायनल करणार आहे. मी ग्रासकोर्टवर विम्बल्डनपूर्वी खेळेल. मी त्याची माहिती देत राहील”
— victoria azarenka (@vika7) May 22, 2017