आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा १०वा दिवस असून आज दोन भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहे. अन्य सर्व भारतीय खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
आज होणाऱ्या सामन्यात मिश्र दुहेरीत १०व्या मानांकित रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीचा सामना बिगर मानांकित हेन्री काँटिनें आणि हेअथेर वॉटसन जोडीशी होणार आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णा हा एकमेव भारतीय खेळाडू असून त्याचा हा सामना उपांत्यपूर्व फेरीचा आहे.
कनिष्ठ गटात मुलींच्या दुहेरीत झील देसाई आणि लुलु सून ही बिगरमानांकीत जोडी द्वितीय मानांकित टेलर जॉन्सन आणि कलैरे लिऊ ह्या जोडीशी खेळणार आहे. विशेष म्हणजे बोपण्णा प्रमाणे झील ही सुद्धा एकमेव भारतीय खेळाडू कनिष्ठ गटात नशीब अजमावत आहे.