मेलबर्न। आज(८ मार्च) ऑस्ट्रेलिया महिला संघाने पाचव्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला आहे. महिला टी२० विश्वचषकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव करत हे विश्वविजेतेपद मिळवले.
२००९ पासून सुरु झालेल्या महिला टी२० विश्वचषकात सर्वात पहिले विजेतेपद इंग्लंडने जिंकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तब्बल ४ वेळा हा विश्वचषक जिंकला. त्यांनी २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ या ४ वर्षी टी२० विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला. तसेच वेस्ट इंडिजने २०१६ ला ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पराभूत करत आपला पहिला महिला टी२० विश्वचषक जिंकला.
आत्तापर्यंतचे महिला टी२० विश्वचषकाचे विजेते आणि उपविजेते –
२००९ – विजेता – इंग्लंड, उपविजेता – न्यूझीलंड
२०१० – विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – न्यूझीलंड
२०१२ – विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – इंग्लंड
२०१४ – विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – इंग्लंड
२०१६ – विजेता – वेस्ट इंडिज, उपविजेता – ऑस्ट्रेलिया
२०१८ – विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – इंग्लंड
२०२० – विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – भारत






