---Advertisement---

बंगाल रणजी संघ सोडल्यानंतर वृद्धिमान साहा धरणार ‘या’ नवीन संघाचा हात, वाचा सविस्तर

On: सोमवार, जून 20, 2022 3:35 PM
---Advertisement---
भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून साहा बंगाल रणजी संघाचा महत्वाचा खेळाडू होता. मात्र या हंगामात तो बंगालसाठी खेळला नाही. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२ मध्ये साहा गुजरात टायटन्ससाठी खेळला. आता अशी माहिती समोर येत आहे की, बंगाल संघाची साथ सोडल्यानंतर साहा एका नवीन रणजी संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो.
बंगाल रणजी संघाचे काही अधिकारी आणि वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी समोर आला होता. माध्यमांमध्ये याविषयी जोरदार चर्चा झाली आणि अखेर साहाने संघाची साध सोडली. साहाने संघ सोडताना असा खुलासा केला होता, की अधिकारी संघासाठी त्याच्या वचनबद्धतेवर शंका घेत होते आणि याच कारणास्तव त्याने संघ सोडला आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने बंगालसाठी चालू रणजी हंगामातील बाद फेरीतील एकही सामना खेळला नाही.
आता अशी माहिती समोर येत आहे की, साहा त्रिपुरा संघासाठी खेळताना दिसू शकतो. एका अधिकाऱ्याने पीटीआयला अशी माहिती दिली की, “त्याला त्रिपुराचा खेळाडू आणि मेंटरची भूमिका पार पाडायची आहे. तो त्रिपुरा संघाच्या वरिष्ठ परिषदेतील काही सदस्यांशी चर्चा करत आहे. पण अद्याप काहीही ठरले नाहीये. अगोदर त्याला कॅबकडून आणि नंतर बीसीसीआयकडून नाहरकत पत्र मिळवावे लागेल. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते.”
वृद्धिमान साहाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघातून बाहेर केले गेले होते. त्याला बोर्डने सुचित  केले आहे की, त्याला भविष्यात संधी मिळण्याची कसलीही शक्यता नाहीये. त्याच्या आजपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने ४० कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये २९.४१ च्या सरासरीने १३५३ धावा केल्या. तसेच १२२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ६४२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरीने ४१.९८ राहिली आहे. त्याने यामध्ये १३ शतक आणि ३८ अर्धशतक ठोकले आहेत.
महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---