सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पहाता भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्ध रद्द किंवा स्थगित झाल्या आहेत. यात क्रिकेटचाही समावेश आहे. भारतात एप्रिल-मे दरम्यान होणारी इंडियन प्रीमीयर लीगलाही अनिश्चित काळासाठी स्थिगिती देण्यात आली आहे.
त्यामुळे अनेक क्रीडापटूंप्रमाणेच क्रिकेट समालोचकांसाठीही पुढील काही दिवस कठीण असणार आहेत. कारण त्यांच्या वेतनात कपात होणार आहे.
स्पोर्ट्सकिडाने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांनी सांगितले की बीसीसीआय समालोचकांना मालिकांनुसार वेतन देते. मात्र कोरोना व्हायरसच्या सक्तीच्या सुट्ट्यामुळे त्यांना त्यांचा मोबदला मिळणार नाही. त्यातील काही लोक त्यांच्या नियमित उत्पन्नाच्या एक तृतीयांश खास चॅट शोद्वारे कमावत आहेत, परंतु ते पुरेसे ठरणार नाही.
तसेच सध्या लाईव्ह शो करण्यासाठीही प्रायोजक मिळणे कठीण झाले असल्याने समालोचकांना वेतन मिळणे आणखी कठीण झाले आहे. जर यावर्षी आयपीएल आयोजित करण्यात आले तर कदाचित ही परिस्थिती सुधारु शकते. मात्र आयपीएलच्या आयोजनावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.
तसेच सध्या भारतीय संघातील खेळाडूंनाही सामना शुल्क मिळत नाही. याबद्दल एक बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की ‘सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे, तर क्रिकेट वेगळे कसे असेल’
समालोचकांना कामकाजाचे तास आणि दिवसांवर वेतन दिले जाते. पण सध्या सामनेे नसल्याने काही तज्ञांना त्यांच्या करारातील एकूण मोबदल्याच्या प्रमाणात (a pro-rata basis) आता मोबदला दिला जाईल.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर सर्वाधिक वेतन मिळणारे समालोचक आहेत. एका सुत्राने असेही सांगितले की ‘लॉकडाऊनमुळे सध्या मार्केटमध्ये खूप कमी प्रायोजक आहेत.’
अशी परिस्थिती असली तरी अनेक जण यातून फायदाही करुन घेत आहेत. अनेक स्टार खेळाडूंना या परिस्थितीचा फटका बसलेला नाही. काही प्रायोजक खेळाडूंच्या लोकप्रियतेच्या आधारावर त्यांच्या ब्रँड्सच्या जाहिराती करत आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
डीआरएस सिस्टीम तेव्हा असती तर भारताच्या या गोलंदाजाने घेतल्या असत्या ९०० विकेट्स
एकेवेळी केली टीम इंडियाची सेवा, आता सामन्याचे पासही मिळणे अवघड
शमीच्या घरातील लाईट तीन वेळा गायब, हे कारणं देत रोहित चिडून गेला निघून