महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रॅंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला यंदा गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर (MCA) भव्य प्रारंभ होणार आहे. एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महिलांना भक्कम क्रिकेटिंग व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा यावर्षी पहिल्यांदाच खेळवली जात आहे. (Women’s Maharashtra Premier League 2025)
वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगची सुरुवात येत्या (5 जून) पासून होणार आहे. डब्लूएमपीएल 2025मध्ये पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड रॉयल्स हे संघ सहभागी होणार आहेत. (WMPL 2025 teams) दरम्यान या स्पर्धेत एकूण 12 लीग सामने खेळवले जाणार आहेत. तर फायनल सामना (14 जून) रोजी होईल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण स्टार क्रिकेटर स्म्रीती मानधनाच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी जेट्सचे संपूर्ण स्क्वॉड जाणून घेऊयात.
WMPL 2025 साठी रत्नागिरी जेट्सचे संपूर्ण स्क्वॉड पुढीलप्रमाणे (WMPL 2025: Full Squad of Ratnagiri Jets)
WMPL 2025 साठी रत्नागिरी जेट्सचे संपूर्ण स्क्वॉड- स्म्रीती मानधना (कर्णधार), गौतमी नाईक, ज्ञानदा निकम, अनुश्री स्वामी, साक्षी कणदी, रसिका शिंदे, चार्मी गवई, भक्ती मिराजकर, प्रियांका घोडके, श्रुती महाबळेश्वरकर, प्रेरणा सावंत, तेजश्री ननावरे, निधी शांभवानी, शिवाली शिंदे, तेजस्विनी बटवळ, ज्ञानेश्वरी पाटील, संजना वाघमोडे, ग्रीशा कतारिया, भूमी फालके, सृष्टी भोईर, समीधा चौगुले, जान्हवी बोकडे, नंदिनी सोनवणे, प्रिया कोकरे
या स्पर्धेत 4 फ्रेंचायझी संघांचा समावेश आहे, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड यांसारख्या प्रमुख शहरांचे प्रतिनिधित्व असलेले संघ मैदानात उतरणार आहेत. रत्नागिरी जेट्स संघातील भारताची स्टार क्रिकेटपटू स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. स्म्रीतीने अनेक सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. तिला कर्णधारपदाचा देखील खूप अनुभव आहे. तिच्या नेतृत्वाखाली वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने जेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले होते. त्यामुळे वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील स्म्रीतीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.
चाहत्यांना स्टेडियमवर मोफत प्रवेश
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार यांनी स्पष्ट केले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघांना व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. (Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry, Grand Drone Show at Opening Ceremony)
घरबसल्या सामन्यांचा आनंद घेता येणार
हे सर्व सामने JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर आणि Star Sports 2 या टीव्ही वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही रोमांचक स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioHotstar)@Sharad Sir @Shivtej






