---Advertisement---

WMPL 2025: रायगड राॅयल्सची संथ फलंदाजी, सोलापुरसमोर 130 धावांचं लक्ष्य!

---Advertisement---

Women’s MPL 2025 मध्ये आज सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड राॅयल्स यांच्यातील महत्त्वाचा सामना रंगत आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात सोलापूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रायगडसाठी हा सामना करो या मरो’ अश्या स्थितीत आहे, कारण त्यांनी याआधीचे दोन्ही सामने गमावले आहेत. स्पर्धेत टिकण्यासाठी हा विजय त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे.

प्रथम फलंदाजी करत रायगड राॅयल्सने 20 षटकांत 129/6 अशी धावसंख्या उभी केली. सलामीवीर श्रावणी देसाईने संयमी खेळी करत 45 चेंडूत 43 धावा केल्या. तिच्या साथीला किरण नवगिरेने 11 चेंडूंमध्ये 18 धावा करत डावाला वेग दिला. या दोघींशिवाय यशोदा घोगरेने देखील 18 तर आदिती गायकवाडने नाबाद 16 धावा केल्या. मात्र इतर फलंदाज काहीसे अपयशी ठरले.

सोलापूर स्मॅशर्सकडून गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी केली. लक्ष्मीदेवी यादव हिने फक्त 2 षटकांत 2 बळी घेतले, तर शरयू कुलकर्णीने चार षटकांत केवळ 17 धावा देत 1 विकेट मिळवली.

सोलापूरसमोर आता विजयासाठी 130 धावांचं मध्यम लक्ष्य आहे. त्यांच्या फलंदाजांची जबाबदारी आता मोठी आहे. दुसरीकडे, रायगडला या सामन्यातून विजय मिळवून गुणतालिकेत पहिले दोन गुण मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---