---Advertisement---

ना पाऊस ना कमी प्रकाश, तरीही ‘या’ कारणामुळे थांबवण्यात आला सामना

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 12:11 AM
match stopped due to sunlight
---Advertisement---

ऑस्ट्रेलयामध्ये सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीगचा सामना शनिवारी खेळला गेला. ऍडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स या संघात अंतिम सामना खेळाला गेला. ऍडिलेड संघाने डिएंड्रा डॉटिनच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर 5 गडी गमावत 147 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला सिडनी संघ 137 धावांवर सर्वबाद झाला आणि ऍडिलेडने 10 धावांनी जिंकून हा किताब आपल्या नावावर केला. या सामन्यात आयोजकांना एका डोकेदुखीला सामोरे जावे लागले. महिला बिग बॅश लीगचा अंतिम एका कारणामुळे थांबवण्यात आला. हा सामना पाऊस किंवा कमी प्रकाशामुळे नव्हे तर कडक उन्हामुळे थांबवण्यात आला.

या सामन्यादरम्यान असे काही बघायला मिळाले, जे ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही सामन्यात बघितल्या गेले नाही. सिडनी सिक्सर्स आणि ऍडिलेड स्ट्राईकर्स या संघामध्ये खेळल्या गेलेल्या महिला बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात अडथळा आला. हा सामना ढग, पाऊस किंवा कमी प्रकाशामुळे नाही तर जास्त सुर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला. ऐकायला विचित्र जरी वाटत असले तरी शनिवारी झालेल्या सामन्यात असेच काहीसे बघायला मिळाले. तीव्र सुर्यप्रकाशानेे या सामन्यात अडथळा निर्माण केला आणि सामना थांबवावा लागला.

तीव्र सुर्यप्रकाशामुळे थांबवावा लागला सामना
महिला बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात सिडनी सिक्सर्स संघ जेव्हा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला , तेव्हा सामना सुरु करता आला नाही. सलामीवीर मैदानावर उतरले होते, पण खेळ सुरु होत नव्हता तर समोलोचकांनी ग्राउंड माईकने मैदानावरील खेळाडूला याबद्दल विचारणा करण्यात आली. ग्राउंड माईकवर असलेल्या अमांडा जेड वेलिंग्टन हीने म्हटले की मी जाउन याबद्दल माहिती घेेते. एका महिला फलंदाजाला तीने विचारले की खेळ सुरु का होत नाहीये. यावर फलंदाज म्हणाली की मला चांगल्या पद्धतीने दिसले तर पाहिजे. शेवटी मी फलंदाजी कशी करणार.

ही काही पहिला वेळ नाहीये, जेव्हा एखादा सामना तीव्र सुर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला. न्यूझीलंडचे नेपियर मैदान अशा गोष्टींसाठी ओळखले जाते. भारत आणि न्यूझीलंड संघात 2019मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय सामना तीव्र ऊन्हामुळे थांबवण्यात आलेला. तसेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील 2020मध्ये खेळलेला सामना याच कारणामुळे थांबवण्यात आलेला. सहसा क्रिकेटची खेळपट्टी उत्तर-दक्षिण दिशेत बनवलेली असते, कारण सुर्य उगवताना आणि मावळताना सूर्याची किरणे फलंदाजाच्या चेहऱ्यावर पडली नाही पाहिजे. मात्र, नेपियर मैदानाची खेळपट्टी पूर्व-पश्चिम दिशेत बनवलेली आहे.(Women Big Bash League Final match stopped while due to Sun’s awkward position)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- न्यूझीलंड संघातील दुसऱ्या वनडेत पाऊस घालणार का रोडा? जाणून घ्या कसे असेल वातावरण
जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---